देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 8 लाखांच्या पार गेली आहे. सोमवारी सलग 5 व्या दिवशी 1 लाखांपेक्षा जास्त प्रकरणे समोर आली. आज जवळपास 12 हजार कमी रुग्ण आढळले आहेत. देशात गेल्या 24 तासांच्या दरम्यान 1 लाख 67 हजार 550 नवीन रुग्ण आढळले आहेत.राज्यात सोमवारी 33,470 नवीन रुग्ण आढळले, तर रविवारी 44,388 रुग्ण आढळले. राज्यात आतापर्यंत 69.53 लाख लोक संसर्गाच्या विळख्यात सापडले आहेत.
यापूर्वी रविवारी 1.79 लाख प्रकरणे आढळली होती. आता देशात एकूण 8 लाख 15 हजार 46 सक्रिय रुग्ण आहेत. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत नवीन रुग्णांमध्ये सुमारे 11 हजारांची घट झाली आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या विळख्यातून बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट होत आहे. रविवारी 15,351 रुग्णांना घरी सोडण्यात आले. सोमवारी 29,671 जणांना डिस्चार्ज मिळाला. 8 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. एकूण राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या आता 2,06,046 झाली आहे.