देशातील करोना संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. अनेक राज्यांमध्ये अनलॉक प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. तर, करोना परिस्थिती पाहून निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल केले जात आहेत
राज्यात आज 10,697कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 14,910 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 56,31,767 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,55,474 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.48% झाले आहे.
मागील २४ तासात देशभरात १ लाख ३२ हजार ०६२ रूग्ण करोनातून बरे झाले असून, ८० हजार ८३४ नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर, ३ हजार ३०३ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.