Covid19: अत्यंत घातक प्रकार ‘डेल्टाक्रॉन’ची  जाणून घ्या काय आहेत लक्षणे..

0
159
Deltacron

कोरोनाची भीती कमी होत असतानाच देशाला धक्का देणारी एक बातमी हाती अली आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने देशातील ७ राज्यात प्रवेश केला आहे.हा नवा व्हेरिएंट कोरोनाचा घटक प्रकार असल्याने केंद्रसरकारने सर्वच राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

धक्कादायक म्हणजे डेल्टाक्रॉनची सर्वाधिक 221 रुग्ण कर्नाटक राज्यात आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. इतकेच नाही तर तामिळनाडूमध्ये 90, महाराष्ट्रात 66, गुजरातमध्ये 33, पश्चिम बंगालमध्ये 32, तेलंगणामध्ये 25 आणि देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत 20 रुग्णांची नोंद झाली आहे.

ऑमिक्रॉन आणि डेल्टाचे मिश्रण असलेल्या डेल्टाक्रॉनची लक्षणे देखील कोरोना व्हायरसच्या इतर व्हेरिएंटसारखीच आहेत. अंगात खूप ताप जाणवतो अगदी स्पर्श केल्यानंतरही ताप असल्याचे समजून येते.सतत खोकला येत राहतो आणि हा खोकला खूप वेळ राहतो.खोकल्याने रुग्णाला थकायला होते.दिवसभरात खोकल्याच्या ३-४ उबळ येतात असेही तज्ज्ञांनी सांगितले आहे. हे एक नवीन लक्षण असल्याचे त्यांनी सांगितले आहे त्यामुळे कोरोना संबंधी काळजी घेताना मास्क लावणे, वारंवार हात धुणे, सोशल डिस्टन्सिंग गरजेचे असल्याचे सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here