मुंबई: गेल्या काही दिवसांपासून देशातील काही राज्यांमध्ये कोरोना रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाचा नवा प्रकार ओमिक्रॉनच्या BA.4, BA.5 व्हेरिएंटचा मुंबईत शिरकाव झाला आहे. सोमवारी मुंबईत BA.4, BA.5 चे 4 रुग्ण आढळून आल्याने आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे.राज्यात बी.ए. 4 व्हेरिएंटचे 3 आणि बी.ए. 5 व्हेरीयंटचा 1 असे 4 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशात कोरोनाची चौथी लाट आल्याची भीती नागरिकांमध्ये पसरली आहे. राज्यात BA.4चे 3 आणि बी.ए. 5 चा एक रुग्ण आढळला आहे.
रुग्णांमध्ये दोन 11 वर्षांच्या मुली आणि दोन 40 ते 60 वर्षे वयोगटातील पुरुषांचा समावेश आहे. विशेष म्हणजे सर्व होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या सर्व रुग्ण बरे झाल्याची माहिती मिळत आहे.देशातील नागरिकांना सतर्क राहाण्याचे आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी केले आहे. आरोग्य मंत्री म्हणाले, कोरोना अजून गेलेला नाही. नागरिकांनी सजग राहावे. काळजी घ्यावी. कोविड-19 च्या नियमांचे काटेकोरपणे पालण करावे.