कोरोनाचे संक्रमण सगळीकडेच पसरते आहे. हा विषाणू नाकावाटे श्वसनलिकेत जाऊन फुफ्फुसांवर परिणाम करतो.त्यामुळे त्यांना सूज येते आणि ऑक्सिजनचे प्रमाण शरीराला कमी पडू लागते. आतापर्यंत कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव श्वसनसंस्थेवर होता असल्याचेच फक्त आपल्याला माहित होते परंतु अमेरिकेतील टॅनेसी विद्यापीठाच्या एका नवीन संशोधनानुसार, कोरोनाने त्रस्त असलेल्या 11% रुग्णांना यकृताची समस्या निर्माण झाली आहे. या डॉक्टरांच्या मते, कोरोनाविरूद्ध विकसित लस देखील आपले यकृत वाचवू शकत नाही.
कोरोनामुळे यकृत कसे खराब होते.
संशोधनात संशोधकांना असे आढळून आले आहे की, कोरोना विषाणू यकृतामध्ये उपस्थित असलेल्या महत्त्वाच्या एंजाइम्सचे प्रमाण वाढवतो. या एंजाइम्सना एलेनिन एमीनोट्रान्सफेरेज (ALT) आणि एस्परटेट एमिनोट्रान्सफेरेज (AST) अशी नावे आहेत. संशोधनानुसार, 15 ते 53 टक्के कोरोना रुग्णांमध्ये हे लिव्हर एंजाइम्स जास्त प्रमाणात आढळून आले. या लोकांचे यकृत तात्पुरते खराब झाले असे म्हणता येईल.कोरोनामुळे यकृताला सूज येते आणि त्यामुळे कावीळीचा आजार होऊ शकतो. याशिवाय काही रुग्णांमध्ये यकृत निकामी होण्याचा धोकाही असतो.
शास्त्रज्ञांच्या मते, जर तुम्हाला यकृताचा गंभीर आजार असेल तर कोरोनाचा धोका आणखी वाढतो. हा संसर्ग तुमच्यासाठी घातकही ठरू शकतो. त्यामुळे कोरोनाल्या हलक्यात घेण्याची चूक करू नका. कोविड प्रोटोकॉलचे पालन करूनच आपण आपल्या शरीराला या आजारापासून वाचवू शकतो.
आहारात काय काळजी घ्यावी
उच्च प्रथिनयुक्त आहार यकृत निरोगी ठेवू शकतो. जेवणामध्ये अंडी, दूध, कडधान्ये, हिरव्या भाज्या, फळे, पनीर, नट्स, सीड्स, बीन्स, मासे आणि चिकन यासारख्या अधिकाधिक गोष्टींचा समावेश करा. कॅफिनचे सेवन केल्याने यकृतातील एंजाइम्स नियंत्रणात राहतात. यामुळे यकृत आणि रोगप्रतिकारक शक्ती दोन्ही मजबूत ठेवेल.या व्यतिरिक्त अल्कोहोल, साखर, मीठ, तळलेले पदार्थ, पांढरा ब्रेड, भात, पास्ता आणि लाल मांस यांचे अतिसेवन टाळा. दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम करा.


