मुंबई: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून नुकताच थोडा दिलासा मिळत असल्याने आरोग्य मंत्रालयाने परदेशातून येणाऱ्या लोकांसाठी नव्या गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. यानुसार परदेशातून आल्यावर 7 दिवस होम क्वारंटाईनची आता गरज भासणार असून प्रवाशांनी 14 दिवस कोरोनाची लक्षण दिसतात का पाहावे. कोरोनाची लक्षणे दिसल्यास त्याने स्वतःला घरीच वेगळे करावे आणि जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.
रुग्ण केंद्र किंवा राज्य हेल्पलाइन नंबरवर देखील संपर्क करू शकतात. नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार, ज्या लोकांनी कोरोना लसीचा पूर्ण डोस घेतला आहे त्यांना कोरोनाचा RT-PCR निगेटिव्ह रिपोर्ट दाखवणे आवश्यक असणार नाही. नवीन मार्गदर्शक तत्त्वे 14 फेब्रुवारीपासून लागू होतील.