रत्नागिरी जिल्ह्यात ग्राम दत्तक योजने अंतर्गत Covid19 या संसर्गजन्य आजाराबद्दल जागृती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.कोकणातील वाढती कोरोना संक्रमितांची संख्या लक्षात घेता सरकारने प्रत्येक गाव कोरोनमुक्त होण्यावर भर दिला आहे.याचाच एक भाग म्हणून ग्राम दत्तक योजना सुरु करण्यात आली आहे.याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलिसांनी जनजागृतीचे काम चालू केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील पूर्णगड येथे पो.नि. गावीत व अंमलदार देऊसकर यांनी Covid19 बाबत आरोग्य सर्वेक्षण करून जनजागृती केली व रनपार येथे निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली. तसेच नाटे येथेही पोलीस अंमलदार व होमगार्ड यांनी Covid19 बाबत आरोग्य सर्वेक्षण करून जनजागृती केली. गुहागर येथे पोलीस निरीक्षक बोडके व अंमलदार यांनी Covid19 बाबत आरोग्य सर्वेक्षण करून जनजागृती केली.
तसेच वाढवलेले लोकडोवन आणि त्याची अंमलबजावणीही होते आहे कि नाही याचीही पडताळणी केली.अनेक बाहेर पडलेल्या लनगरीकांची तपासणी केली. त्याशिवाय जिल्ह्यात ठिकठिकाणी चाललेल्या लसिकानाचाही आढावा घेतला. सावर्डे,जयगड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये लसीकरण शांततेत पार पडले.