कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढत असतानाच ऑक्सिजनची पातळी काही होऊन रुणांना रुग्णालयात दाखल करावे लागत होते.कोरोनाचा संसर्ग फुफुसापर्यंत पोहोचल्यामुळे रुग्णांना श्वासाचा त्रास होत होता .ऑक्सिजनची गरज भासत होती आणि त्याचवेळी रेमडेसिविर इंजेक्शनही लागत होते. त्यासाठी रांगा लागत होत्या.अनेकांनी काळ्याबाजारात हे इंजेक्शन विकून भरमसाट कमाई केली. जिल्ह्यांतील रुग्णांचे नातेवाईक शहरात हे इंजेक्शन घेण्यासाठी येत होते.अगदी राजकारणी लोकांनीही कोरोना काळात रेमिडिसीवीर इंजेकशन दुसऱ्यामार्फत विकून पैसे कमावला.
मात्र आता कोरोनाच्या ओमिक्रोन या विषाणूच्या संसर्गात रुग्णांचे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाणही कमी असल्याने आणि रेमिडिसीवीर इंजेकशनची गरकज भासत नसल्याने बाजारात या इंजेकशनला मागणी नाही असे दुकानदार सांगत आहेत.