सिंधुदुर्ग: कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे सावंतवाडी तालुक्यात 14 ठिकाणी कंटेन्मेंट झोन लागू करण्यात आले आहेत. सावंतवाडीत कोरोनाचे एकूण १४ रुग्ण आढळेल आहेत.तर तालुकानिहाय कोरोनाच्या रुग्णानाची संख्या १३१ आहे.सावंतवाडीत कोरोनाचे एकूण १४ रुग्ण आढळेल आहेत वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन सावंतवाडी शहरात आणि तालुक्यात ठिकठिकाणी कंटेन्मेंट झोन लागू करण्यात आले आहेत.
त्यामुळे कंटेन्मेंट झोन पुढील प्रमाणे आहेत.
सावंतवाडी सालईवाडा – राजरत्न कॉम्प्लेक्स, सबनिसवाडा येथील तुळजा आर्केड डी वॉर्ड,
बाहेरचावाड येथील सी वॉर्ड नवीन इमारत सदनिका,सावंतवाडी -माठेवाडा येथील बी वार्ड,
सावंतवाडी- माठेवाडा येथील बी वॉर्ड गणेश रेसिडन्सी,सावंतवाडी वैश्यवाडा येथील वॉर्ड बी,
माठेवाडा येथील वॉर्ड बी, सालईवाडा येथील वॉर्ड एफ,सर्वोदयनगर,
सावंतवाडी सालईवाडा येथील वॉर्ड एफ,
सावंतवाडी- खासकीलवाडा,सावंतवाडी- खासकीलवाडा येथील मयुर प्लाझा वरिल सर्व ठिकाणाच्या परिसर हा दि. 24 जानेवारी पर्यंत कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे.
तसेच सावंतवाडी- माठेवाडा येथील वॉर्ड बी, खासकीलवाड येथील सदनिका, खासकीलवाडा येथील कल्पना रेसिडेन्सी येथील परिसर दि.25 जानेवारी 2022 पर्यंत कंटेन्मेंट झोन जाहिर करण्यात आले आहेत. सदर कंटेन्मेंट झोनमध्ये जाहीर करण्यात आलेल्या दिनांकापर्यंत सर्व आस्थपना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहे. तसेच नागरिकांच्या येण्या-जाण्यास व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद आहे.
सावंतवाडी तालुक्यातील व त्यांच्या आजुबाजूचा परिसर व कोरोना बाधीत क्षेत्र म्हणुन घोषित केलेल्या सर्व गावे, वाड्या यामधील सर्व शासकीय कार्यालय,सार्वजनिक ठिकाणे येथे लेखी नोटीस लावून व दवंडी देवून संबंधित,तलाठी,गामसेवक व पोलीस पाटील यांनी प्रसिध्दी द्यावी. स्थलांतरित मजूर, पर्यटक, भाविक,विद्यार्थी व इतर व्यक्तींना त्यांचे वास्तव्यास मुळ ठिकाणी स्थलांतर करण्यास परवानगी दिली असली तरी कोरोना विषाणू बाधित क्षेत्रातून अशा व्यक्तींना स्थलांतरणास परवानगी राहणार नाही.
सदर आदेश अत्यावश्यक सेवा जसे सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकीय उपचार व्यवस्था इ. वितरीत करणारे, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या वाहनांना लागू असणार नाहीत. या आदेशाचा भंग केल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 व 58, तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 71,139 आणि भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल असे आदेश प्रशांत पानवेकर उपविभागीय दंडाधिकारी, सावंतवाडी यांनी दिले आहेत.


