कोरोना विषाणूसाठी भारतात कोवि शल्ड आणि कॉव्हक्सिन या दोन लसींबरोबरच स्पुतनिक हि लसही देण्यात आली.भारतात यापूर्वी 2021 मध्ये, सिंगल डोस असलेली जॉन्सन अँड जॉन्सनची कोरोना लस मंजूर करण्यात आली होती.
आता भारतातील ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DGCI) कडून आपत्कालीन वापरासाठी ‘स्पुतनिक लाइट’ या लसीच्या वापरला मान्यता देण्यात आली आहे. ‘स्पुतनिक लाइट’ ही लस रशियाने तयार केली आहे. त्यातील रासायनिक रचना हि रशियाच्याच डबल डोस व्हॅक्सिन स्पुतनिक V सारखीच आहे. स्पुतनिक लस फायझर लसीच्या डबल डोसच्या तुलनेत ओमायक्रॉनच्या विरूद्ध दोनपट जास्त अँटीबॉडी तयार करते असे तज्ज्ञांचे मत आहे.