पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची लस आता घरोघरी जाऊन लोकांना दिली जाणार असल्याची घोषणा केली आहे.त्यांनी आज ‘हर घर दस्तक’ मोहिमेला सुरुवात केली असल्याचे सांगितले.त्यानंतर 12 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत त्यांच्याकडून कोरोना आणि लसीशी संबंधित माहिती घेतली.लसीकरण धिम्या गतीनं सुरू असल्यानं पंतप्रधानांनी चिंताही व्यक्त केली.या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला.