दिल्ली जालियनवाला बाग हत्याकांड हि इतिहासातील प्रमुख घटना आहे. 13 एप्रिल 1919 रोजी जालियानवाला बागमध्ये इंग्रजांनी एक हजारहून अधिक लोकांची हत्या केली होती त्यामुळे दिल्लीतील जालियनवाला बाग या स्थळाला ऐतिहासिक इतिहास आहे.केंद्र सरकारने या स्थळाचे नूतनीकरण करण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून हे स्थळ पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले होते.आता या स्थळाचे नूतनीकरण संपले आहे .पण यातील बदललेल्या नवीन रचनेवर इतिहासकार,लेखक,राजकर्ते,सामान्य जनतेने टिपणी करण्यास सुरुवात केली आहे.
अनेकांना बदलेली नवीन रचना आवडलेली नाही. आता यावरून चांगलेच राजकारण सुरू झाले आहे. ज्या निमुळत्या वाटेला अडवून इंग्रजांनी भारतीयांना बाहेर पडू दिले नव्हते. त्याच, निमुळत्या वाटेचे विचित्र असे सुशोभिकरण करण्यात आल्याचा विरोधकांचा आरोप आहे. ज्या भिंतीवर गोळ्या घातल्याची चिन्हे दिसत होती तिथे थोडी जागा शिल्लक ठेऊन नागरिकांच्या मुर्त्या लावण्यात आल्या आहेत. त्याशिवाय ज्या विहिरीत नागरिकांनी गोळीबार होताना जीव वाचविण्यासाठी उड्या मारल्या ती विहीरही आता चारही बाजूनी काचेच्या झाकण्यात आली आहे.पूर्वी या विहिरीजवळ पर्यटक जाऊ शकत होते. तसेच या बागेचा येण्याचा आणि जाण्याचा मार्गही बदलण्यात आला आहे.त्याबद्दलही सामान्य नागरिकांकवून विरोध होत आहे.
“मी एका हुतात्म्याचा मुलगा असून मी हुतात्म्यांचा अपमान कोणत्याही किंमतीवर सहन करणार नाही. या अभद्र क्रूरतेच्या विरोधात आहे”अशी टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी केली आहे.