नवी दिल्ली- जगभरातील काही देशांमध्ये कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता आजपासून भारतात दाखल होणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांची विमानतळांवर कोरोना चाचणी केली जाणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-संत-राऊळ-महाराज-महाविद्/
चीनमध्ये वाढत्या कोरोना रूग्णांच्या संख्येनंतर केंद्र सरकारने वेळीच सावध पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. वाढत्या रूग्णससंख्येच्या पार्श्वभूमीवर आज वरीष्ठ अधिकारी आणि केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत चीनमधील वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली. तसेच भारतातील सध्याच्या स्थितीचाही अभ्यास करण्यात आला. दरम्यान, जगभरातील काही देशांमध्ये वाढती कोरोनाची संख्या लक्षात घेता आजपासून भारतात दाखल होणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांची आजपासून विमानतळांवर कोरोना चाचणी केली जाणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे.