मुंबई – अनुज केसरकर
राज्यपाल कोश्यारी यांच्या मुख्य उपस्थितीत डॉ राम मनोहर त्रिपाठी सेवा समिती व श्रीमती दुर्गादेवी शर्मा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महावीर प्रसाद द्विवेदी स्मृती संरक्षण अभियान रजत जयंती सन्मान व मराठी – हिंदी कवी संमेलनाचे गुरुवारी राजभवन येथे आयोजन करण्यात आले, त्यावेळी राज्यपाल बोलत असताना महावीर प्रसाद द्विवेदी यांचे हिंदी साहित्य विश्वात मोठे नाव आहे. ज्याप्रमाणे संत तुलसीदास, मीराबाई, संत ज्ञानेश्वर, तुकाराम, गुरुनानक यांना विसरता येणे शक्य नाही, त्याचप्रमाणे हिंदी भाषेला प्रचलित रूप देणाऱ्या महावीर प्रसाद द्विवेदी व हजारी प्रसाद द्विवेदी यांना विसरता येत नाही. महावीर प्रसाद द्विवेदी यांचे जन्मगाव असलेल्या रायबरेली जिल्ह्यातील दौलतपूर या गावचा साहित्यिक पर्यटन स्थळ म्हणून विकास करावा या दृष्टीने आपण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचेकडे पत्रव्यवहार करू तसेच पाठपुरावा करू असे आश्वासन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे दिली. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-सततच्या-बदलत्या-
प्रसिद्ध साहित्यिक व माजी मंत्री डॉ राम मनोहर त्रिपाठी मुंबई महानगरीत आले व महाराष्ट्राशी समरस झाले. डॉ राम मनोहर त्रिपाठी यांनी साहित्य, समाजकारण व राजकारणात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले असे राज्यपालांनी सांगितले./https://sindhudurgsamachar.in/maharashtra-5-स्टार-रेटींगवालीच-
कार्यक्रमाला माजी मंत्री कृपाशंकर सिंह, माजी आमदार राज के पुरोहित, गीतकार मनोज मुंतशीर, अनूप जलोटा, डॉ मंजू पांडे, अनुराग त्रिपाठी, राजीव नौटियाल, समाजसेवक प्रशांत शर्मा, अनिल गलगली, सुबोध शर्मा, ब्रिजमोहन पांडे, डॉ प्रदीप व्यास, दीपक पांडे, हरबंस सिंह, अमरजीत मिश्रा, शचिंद्र त्रिपाठी, हेमराज शाह, आर यू सिंह, जितेंद्र दीक्षित, बी आर भट्टड़, डॉ राजेंद्र सिंह, सुमिता सुमन सिंह, हरीश सणस पूनम त्रिपाठी, डॉ व्यंकटेश जोशी, डॉ दीपनारायण शुक्ला, अशोक त्रिवेदी, अजय शुक्ला यांसह साहित्यिक, पत्रकार व इतर मान्यवर उपस्थित होते.
राज्यपालांच्या हस्ते यावेळी डॉ राम मनोहर त्रिपाठी यांच्या रचना संगीतबद्ध केल्याबद्दल भजन सम्राट अनुप जलोटा तसेच आचार्य महावीर प्रसाद द्विवेदी स्मृति संरक्षण अभियान संस्थेचे निमन्त्रक गौरव अवस्थी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी झालेल्या काव्य संमेलनात रामदास फुटाणे, डॉ सुनील जोगी, योगेंद्र शर्मा, राजीव राज व ज्योती त्रिपाठी यांनी काव्य सादरीकरण केले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन अनिल त्रिवेदी यांनी केले.

