Desh -Videsh: राष्ट्रकुल वेटलिफ्टिंगमध्ये भारताला १८ पदके

0
101
राष्ट्रकुल वेटलिफ्टिंगमध्ये भारताला १८ पदके
राष्ट्रकुल वेटलिफ्टिंगमध्ये भारताला १८ पदके

नवी दिल्ली- नोएडायेथे झालेल्या राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप्समध्ये भारताच्या पथकाने एकूण १८ पदकांची कमाई केली. भारताने ८ सुवर्ण, ८ रौप्य व २ कांस्यपदक या स्पर्धेत मिळविली. या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी पुरुषांच्या १०९ किलो वजन गटात लवप्रीत सिंगने रौप्य तर महिलांच्या ८७ किलोवरील वजन गटात पुर्णिमा पांडेने कांस्यपदक मिळविले. https://sindhudurgsamachar.in/kokan-बांदा-प्राथमिक-आरोग्य-के/

लवप्रीतने एकूण ३४१ (स्नॅचमध्ये १५४, क्लीन व जर्कमध्ये १८७) किलो वजन उचलत दुसरे स्थान मिळविले. फिजीच्या तनीला रेनिबोगीने सुवर्ण (३६३ किलो), व ब्रिटनच्या अँड्र्यू ग्रिफिन्सने (३४० किलो) कांस्य पटकावले. नंतर पुर्णिमा पांडेने ८७ किलोवरील वजन गटात २२७ (१०२ व १२५) किलो वजन उचलत तिसरे स्थान मिळविले. सामोआच्या लुनिआरा सिपाइयाने एकूण २६२ किलो वजन उचलत सुवर्ण व तिचीच देशवासी लेसिला फियापुलेनने २५० किलो वजन उचलत रौप्य मिळविले. शेवटच्या दिवशी दोन पदके मिळवित भारताने मागील आवृत्तीपेक्षा सरस कामगिरी नोंदवली. २०२१ मध्ये ताश्कंद येथे झालेल्या स्पर्धेत भारताने एकूण १६ पदके मिळविली होती, त्यात ४ सुवर्ण, ७ रौप्य, ५ कांस्यपदकांचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here