DRDO ने तयार केलेले अँटी कोरोना ड्रग 2DG चे 10,000 पॅकेट आज(दि.17) आपातकालीन वापरासाठी रुग्णांना दिले जाणार असल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन देण्यात आली आहे.आज सकाळी 10.30 वाजता व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे औषधाची पहिली खेप रिलीज केली जाणार
आहे.
अँटी कोरोना ड्रग 2DG हे औषध DRDO च्या इंस्टीट्यूट ऑफ न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड साइंसेस (INMAS) आणि डॉ. रेड्डीज लॅबोरेट्रीज यांनी मिळून तयार केलेले आहे. हे औषध पाउडर स्वरुपात आहे. हे औषध 5.85 ग्राम पाकिटात उपलब्ध होणार आहे. याचे एक पाकीट सकाळी आणि संध्याकाळी पाण्यात मिसळून दिले जाते. याचे चांगली परिणाम दिसून आले आहेत. या औषधाला सर्वात आधी दिल्लीतील DRDO कोविड रुग्णालयातील रुग्णांना देण्यात आले होते आणि याचा चांगला परिणाम दिसून आला आहे.
काट्याने काटा काढावा या म्हणीप्रमाणे हे औषध उपयोगी ठरत आहे. कोरोनामध्ये ग्लुकोजच्या आधारे कोरोनाचे विषाणू दुप्पट होत जातात.या औषधात खोटी ग्लुकोज निर्माण होते.त्यामुळे विषाणू हीच ग्लुकोज खातो आणि दुप्पट होण्याऐवजी मरून जातो.त्यामुळे रुग्ण कोरोनावर विजय मिळवतो.