गोवा: 27 मे या दिवशी गोव्यातील वास्को येथे प्रथमच होणार्या ‘सी-20 परिषदे’च्या माहिती पुस्तिकेचे गोवा राज्याचे मुख्यमंत्री श्री. प्रमोद सावंत यांच्या हस्ते पणजी येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी प्रकाशन करण्यात आले. या वेळी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या संशोधन समन्वयक सौ. श्वेता, डॉ.(सौ.) अमृता देशमाने आणि व्यावसायिक श्री. नारायण नाडकर्णी हे उपस्थित होते.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-एएलडी-ऑटोमोटिव्हने-लीज/
मुख्यमंत्र्यांच्या पणजी येथील शासकीय निवासस्थानी आंतरराष्ट्रीय ‘जी-20’साठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. या कक्षातच ‘सी-20 परिषदे’च्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या ‘सी-20 परिषदे’चे आयोजन गोवा सरकार, ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’, ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीज’ आणि ‘भारतीय विद्या भवन, नवी दिल्ली’ या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. 27 मे या दिवशी ‘विविधता, सर्वसमावेशकता आणि परस्पर आदर’ या विषयावर ‘सी-20 परिषद’ वास्को येथे होणार आहे. यात गोव्यासह देश-विदेशांतील मान्यवर वक्ते विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. या प्रकाशनानंतर मा. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने केलेले विविध आध्यात्मिक संशोधन आणि देशविदेशांतील कार्य यांविषयी जाणून घेत या कार्याचे मुख्यमंत्र्यांनी कौतुकही केले.