वेंगुर्ला प्रतिनिधी- गोवा रेडक्रॉस या सेवाभावी संस्थेच्यावतीने ‘माझा वेंगुर्ला‘ या संस्थेसाठी दोन कॉन्सेट्रेटर आणि रोटरी ट्रस्ट सावंतवाडीला दोन कॉन्सेट्रेटर व दोन व्हीलचेअर मोफत प्रदान करण्यात आले.
‘माझा वेंगुर्ला व रोटरी ट्रस्ट’ सावंतवाडी या संस्थेमार्फत परिसरातील गरजू रुग्णांना आवश्यक वैद्यकीय सेवासाधनांची उपलब्धता करुन देताना कॉन्सेट्रेटर, व्हिलचेअर, मेडिकल बेड अशा विविध वैद्यकीय सेवासाधनांची तातडीने गरज भासत असते. दोन्ही संस्थांनी गोवा रेडक्रॉस चेअरमन तथा रोटरी माजी प्रांतपाल गौरीश धोंड यांच्याकडे मागणी केल्यानुसार त्यांनी कॉन्सेट्रेटर व व्हीलचेअर या संस्थांकडे सुपूर्द केल्या.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-राज्यातील-विविध-प्रश्न/
यावेळी शिक्षण मंत्री दिपक केसरकर, गोवा रेडक्रॉस चेअरमन गौरीश धोंड, माजी असिस्टंट गव्हर्नर राजेश घाटवळ, सावंतवाडी रेटरी क्लब प्रेसिडेंट विनया बाड, विश्वस्त वसंत करंदीकर, डॉ.महेश जोशी, साईप्रसाद हवालदार, आनंद रासम, सुधीर नाईक, प्रमोद भागवत, दिलीप म्हापसेकर, जायबा धुरी, सुहास सातोसकर, डॉ.राजेश नवांगुळ, राजेश रेडीज, माझा वेंगुर्लाचे कपिल पोकळे, यासीर मकानदार, वेंगुर्ला रोटरीचे दादा साळगांवकर, प्रा.पिटर रॉड्रिग्ज, आनंद बोवलेकर, प्रा.वसंत पाटळे आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटोओळी – गोवा रेडक्रॉसतर्फे माझा वेंगुर्ला व रोटरी ट्रस्ट सावंतवाडी या संस्थांना वैद्यकीय सुविधा प्रदान करण्यात आल्या.