पणजी: गोवा पर्यटन विभागाने अलीकडेच अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे गोवा येथे जाण्यापूर्वी गोवा सरकारचे नवे नियम माहिती असणे आवश्यक आहे. गोव्याची पर्यटन क्षमता नष्ट होण्यापासून वाचवण्यासाठी सरकारने हा आदेश जारी केला आहे. या नियमांचे पालन न केल्यास 5 हजार रुपये रुपये दंड आकारला जाणार आहे. ही रक्कम वेगवेगळ्या 50 हजार रुपयांपर्यंत वाढवली जाऊ शकते. तसेच नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर आयपीसी कलम 188 अंतर्गत कारवाई होऊ शकणार आहॆ .https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-सिंधुदुर्ग-दौ-यात-विविध/
या नवीन लागू केलेल्या नियंमानमःये पर्यटन विभागाने सार्वजनिक ठिकाणी अन्नपदार्श शिजवण्यास आणि लाइव्ह किचन फॉरमॅटवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच गोव्यात आता यापूढे समुद्रकिनाऱ्यावर बसून दारू पिणे किंवा बिअर पिण्यासही बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय समुद्र किनाऱ्यावर बाईकवरून फेरी मारण्यास किंवा अधिकृत, अनधिकृत वाहने नेण्यास मनाई आहे. वाहन चालविण्यास देखील बंदी घालण्यात आली आहॆ. गोव्यातील किल्ले, मंदिर, चर्च आणि जंगलातही बसून दारू पिण्यास बंदी असेल. यापूढे केवळ रेस्टॉरंटच्या आत मद्यपान बैठकीची व्यवस्था असलेल्या ठिकाणीच मद्यपान करता येणार आहे. तसेच मालवण (महाराष्ट्र) आणि कारवार (कर्नाटक) यांसारख्या राज्याच्या बाहेरील भागात वॉटर स्पोर्ट्ससाठी अनधिकृत तिकीट विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-रेडी-येथील-रक्तदान-शिबि/


