तौकते चक्रीवादळाच्या वेगाने वहाणाऱ्या वाऱ्यांनी सगळीकडे अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. याबरोबरच विजेच्या तारांवर ही झाडे पडल्यामुळे अनेक तारा तुटल्या असून वीजपुरवठा खंडित झाला आहे. अनेक विजेचे खांब उखडून पडले आहेत.वीजपुरवठा खंडित होऊन आता १५ तासांपेक्षा जास्त वेळ झाला आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी वीजपुरवठा सुरळीत होण्यास अजून दोन दिवस लागतील असे सांगितले आहे. उत्तर गोव्यातील बार्डेझ आणि साऊथ गोव्यातील मार्मुगोवा ही गांवे सगळ्यात जास्त या वादळाने प्रभावित झाली आहेत.गोआ मेडिकल कॉलेजचाही १५ मिनिटांसाठी वीजपुरवठा खंडित झाला हॊता पण सर्व कोविड सेंटर्सना विद्युत जनित्रं पुरविण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. जवळ जवळ २५० वीज कर्मचारी विदुयत पुरवठा सुरळीत कण्याच्या कमला लागले आहेत अशीही माहिती दिली.
विदुतपुरवठा नसल्यामुळे पाण्याचीही अडचण नागरिकांना जाणवत आहे .