प्रतिनिधी- राहुल वर्दे
गोवा: ५३ वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा साजरा केला जाणार आहे. या महोत्सवाची ठिकाणची पहाणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पाहणी केली असून देश विदेशातील कलाकार ,दिग्दर्शक, आणि चित्रपट प्रेमीनी गोव्यात हजेरी लावली आहे. गोव्यातिल प्रमुख चौकात तसेच राजधानी पणजी येथे भव्य सजावट करण्यात येत आहे .
20 नोव्हेंबर रोजी शाम मुखर्जी स्टेडियम वर सायंकाळी 5 वाजता शुभारंभ होणार असून जय्यत तयारी सुरू आहे. या महोत्सवासाठी माहिती प्रसारण खात्याकडून 40 कोटी तर गोवा मनोरंजन सोसायटी कडून 17 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. ५० पेक्षा जास्त महिलांचे चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत. ७९ देशातील 280 चित्रपट प्रदशीत होणार असून 500 पेक्षा जास्त चित्रपट प्रदर्शित होणार आहेत अशी माहिती ऐनएफडीसि चे सी .इ. ओ रवींद्र भाकर,गोवा मनोरंजन सोसायटी स्वेतिका सचन यांनी पत्रकार परिषदेत दिली. ५३ वा इफफी च्या उत्सवाची सजावट 2012 देसाई यांच्या कडे असून यंदा वर्षी देखील ही जबाबदारी पार पाडणार असा विश्वास व्यक्त केला.

