⭐२२ मार्चपासून रंगणार थरार, मुंबईचा पहिलाच सामना चेन्नई सुपरकिंग्जशी
🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l क्रीडा l 17 फेब्रुवारी
इंडियन प्रीमियर लीग २०२५ चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. आयपीएलच्या १८ व्या हंगामाची सुरूवात २२ मार्चपासून होणार असून अंतिम सामना २५ मे रोजी होणार आहे. गेल्या तीन वर्षांप्रमाणेच यंदाही आयपीएलमध्ये १० संघांचा समावेश असून एकूण ७४ सामने खेळले जाणार आहेत. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२५ च्या हंगामाची सुरुवात २२ मार्च रोजी गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) यांच्यातील सलामीच्या सामन्याने ईडन गार्डन्सवर होणार आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-इंडियन-ऑइलमध्ये-457-जागांस/
65 दिवसांत 74 सामने
यंदा आयपीएलचा 18 वा हंगाम असणार आहे. टी-20 क्रिकेटमधील ही सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धा आहे. 22 मार्चला कोलकात्यातील इडन गार्डन्स स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू (RCB) यांच्या सामन्यानं आयपीएल 2025 ची सुरुवात होणार आहे. देशभरातील 13 वेगवेगळ्या ठिकाणी यंदाच्या आयपीएलचे सामने होणार आहेत. दोन महिन्यांहून अधिक काळ आयपीएलची धमाल क्रिक्रेटप्रेमींना अनुभवायला मिळणार आहे.
या मोसमात 12 दिवसांमध्ये दररोज दोन सामने खेळले जाणार आहेत. दिवसाचा सामना दुपारी 3:30 वाजता सुरू होईल. तर रात्रीचा सामना रात्री 7:30 वाजता सुरू होणार आहे. आयपीएल 2025 चा ओपनिंग सामना ऐतिहासिक ईडन गार्डन स्टेडियमवर होणार असून हा सामना गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होईल. यंदा स्पर्धेत एकूण १० संघ सहभागी होणार असून यांच्यात एकूण 74 सामने खेळवले जातील. आयपीएलच्या इतिहासात सर्वात मोठी राइवलरी असणारी मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात वेळापत्रकानुसार दोनदा टक्कर होणार आहे. 23 मार्च आणि 20 एप्रिल रोजी दोन्ही संघांमध्ये सामना होणार आहे. तर पंजाबचे 4 होमग्राउंड सामन्यांपैकी एक सामना हा मुल्लांपुर तर उर्वरित 3 सामने हे धर्मशाला स्टेडियमवर होतील. 20 मे रोजी क्वालीफायर-1 आणि 21 मे रोजी एलिमिनेटर-2 हे सामने हैदराबादमध्ये होतील. 23 मे रोजी क्वालीफायर 2 आणि 25 मे रोजी फायनल सामना हा कोलकातामध्ये होईल.
नॉकआउट सामन्यांची तारीख :
20 मे – क्वालीफायर-1
21 मे – एलिमिनेटर
23 मे – क्वालीफयर-2
25 मे – फाइनल सामना