Koakn: ‘क्विज आयटी टेकफेस्ट’ची जनरल चॅम्पियनशिप कुडाळच्या एसआरएम कॉलेजकडे

0
82
एसआरएम कॉलेज,'क्विज आयटी टेकफेस्ट',
'क्विज आयटी टेकफेस्ट'ची जनरल चॅम्पियनशिप कुडाळच्या एसआरएम कॉलेजकडे

हेगशेट्ये महाविद्यालयाच्या ‘सीएसआयटी’ विभागातर्फे आयोजन

रत्नागिरी– येथील नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (सीएसआयटी) विभागातर्फे राज्यस्तरीय ‘क्विज आयटी टेकफेस्ट’चे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या फेस्टच्या जनरल चॅम्पियनशिपवर कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) येथील एसआरएम महाविद्यालयाने आपले नाव कोरले. नुकत्याच आयोजित या फेस्टमध्ये २०० हून अधिक मुले सहभागी झाली होती.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-कोल्हापूर-येथे-नर्सिंग/

सकाळी प्राचार्या डॉ. सौ. आशा जगदाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत या फेस्टचे उद्घाटन करण्यात आले. दिवसभर चाललेल्या या फेस्टचा बक्षीस वितरण सोहळा संध्याकाळी सिनर्जी सिस्टिमचे संस्थापक आणि महाविद्यालायचे माजी विद्यार्थी प्रीतम गावडे यांच्या प्रमुख उपस्थित आणि प्राचार्या डॉ. सौ. जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या वेळी ‘सीएसआयटी’ विभागप्रमुख प्रा. प्रतीक्षा सुपल, प्रा. ताराचंद ढोबळे, प्रा. सुकुमार शिंदे यांच्यासह प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री. गावडे म्हणाले, ”आयटी क्षेत्राच्या बाबतीत संपूर्ण जग भारताकडे अभिमानाने बघते आहे. डिजिटल पेमेंट ट्रांस्फॉर्मेशन भारत सरकारने भारतात केले गेले आणि त्याचा जगाने आदर्श घेतला. वर्ल्ड बँकेने यावर अभ्यास सुरू केला. मायक्रोसॉफ्टच्या बिल गेट्स यांनी याची दखल घेतली. फ्रान्समधील आयफेल टॉवर पाहण्यासाठी गेलात तर तिथेही द्यावे लागणारे तिकीटही गुगल पेने स्कॅन करता येते, ही माहिती तंत्रज्ञान क्षेत्राने केलेली उल्लेखनीय कामगिरी आहे. आपल्या हातात इंटरनेट आल्यामुळे किती गोष्टी सोप्या झाल्या आहेत. त्यामुळे बँकिंग, स्टॉक मार्केट अशा बऱ्याच गोष्टी आपण मोबाईलवर हाताळतो; ६जी आल्यामुळे अजूनही मोठ्या पद्धतीचे बदल होणार आहेत आणि अतिशय अभिमानास्पद गोष्ट ही आहे माहिती तंत्रज्ञान विभागातली की सगळ्यात स्वस्त इंटरनेट भारतात मिळते.”

”सध्या भारतात ४डी मॅपिंग आणि होलोग्रॅमसारख्या तंत्रज्ञानावर यावर सॉफ्टवेअर इंजिनियर्स काम करत आहेत. पूर्वी आपण साधे फोन करत होतो. त्यानंतर ४ जीच्या जमान्यात आपण व्हिडिओ कॉलवर बोलू लागलो. ४डी मॅपिंग आणि होलोग्रॅमच्या माध्यमातून तुम्हाला जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात असलेला माणूस समोर प्रत्यक्ष उभा दिसेल. त्याची ४डी इमेज आपल्याला दिसेल. ही मोठी क्रांती आयटी क्षेत्राच्या माध्यमातून झाली आहे. त्यामुळे आपल्याला अभिमान असला पाहिजे आपण आयटी क्षेत्राचा अभ्यास करतोय आणि भविष्यात त्यात काम करणार आहोत,” असे त्यांनी सांगितले.

माहिती तंत्रज्ञात क्षेत्रात भारताने घेतलेल्या गरुडझेपेचा आढावा या वेळी श्री. गावडे यांनी घेतला. या प्रसंगी प्राचार्या डॉ. जगदाळे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

‘क्विज आयटी टेकफेस्ट’चा निकाल अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय असा : क्विज आयटी – श्रावणी पुराणिक, तेजस पांगारकर (गोगटे जोगळेकर कॉलेज, रत्नागिरी), सर्वेश खानविलकर, कावेरी कदम (आठल्ये-सप्रे-पित्रे कॉलेज, देवरूख), दर्पण मेस्त्री, चिन्मय तांबे (एसआरएम कॉलेज, कुडाळ). स्मार्ट कोडर – तेजस खानोलकर (एसआरएम कॉलेज), कौशिक मुसळे (गोगटे जोगळेकर कॉलेज), अथर्व चव्हाण (गोगटे जोगळेकर कॉलेज). गुगल आयटी – चिन्मय तांबे (एसआरएम कॉलेज), अथर्व कुलकर्णी (गोगटे जोगळेकर कॉलेज), मुस्तफा जांभारकर (गोगटे जोगळेकर कॉलेज). पीपीटी इव्हेंट – एलविश डिसूझा (एसआरएम कॉलेज), हुमेरा मुकादम (एसआरएम कॉलेज), कौशिक मुसळे (गोगटे जोगळेकर कॉलेज). मोबाईल फोटोग्राफी इव्हेंट – प्रथमेश पाटकर (एसआरएम कॉलेज), महादेव टेमकर (एसआरएम कॉलेज), वेदांग पाटणकर (गोगटे जोगळेकर कॉलेज). बीजीएमआय इव्हेंट – तसमील मुकादम आणि सहकारी (फिनोलेक्स कॉलेज, रत्नागिरी) कमलेश मेस्त्री आणि सहकारी (एसआरएम कॉलेज). फ्री फायर इव्हेंट – फिनोलेक्स कॉलेज (प्रथम), पॉलिटेक्निकल कॉलेज (रत्नागिरी, द्वितीय). जनरल चॅम्पियनशिप – एसआरएम कॉलेज.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here