वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला पोलीस ठाण्याच्या माध्यमातून नुकतीच अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम राबविण्यात आली. यात अंमली पदार्थांचे नुकसान आणि त्याचे दुष्परिणाम यावर मार्गदर्शन व रॅली असे उपक्रम घेण्यात आले.
या कार्यक्रमामध्ये आर. के. पाटकर हायस्कूल, मदर तेरेसा इंग्लिश स्कूल तसेच बॅ.खर्डेकर कॉलेज येथे मार्गदर्शन सत्र राबविण्यात आले. या मोहिमेअंतर्गत दाभोली नाका ते बाजारपेठपर्यंत विद्यार्थ्यांसमवेत रॅली काढण्यात आली. यात मदर तेरेसा इंग्लिश स्कूलच्या जवळपास १०० ते १५० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. तसेच खर्डेकर महाविद्यालय, पाटकर हायस्कूल आणि वेंगुर्ला बस स्थानक या ठिकाणी अंमली पदार्थ विरोधी मार्गदर्शन करण्यात आले. वेंगुर्ला पोलिस निरीक्षक संदीप भोसले आणि पोलिस कर्मचा-यांनी अंमली पदार्थ आपल्या जीवनासाठी कसे घातक आहे आणि त्याचे काय दुष्परिणाम भविष्यात भोगावे लागतात याबद्दलचे मार्गदर्शन केले. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत जाधव, पोलिस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक तावडे, पोलिस हवालदर सखाराम परब, पोलिस महिला हवालदार कदम, महिला हवालदार दिपा धुरी, वाहतूक पोलिस अंमलदार गौरव परब, मनोज परुळेकर, पोलिस प्रथमेश पालकर, पाटकर हायस्कूलचे प्रा. महेश बोवलेकर, मदर तेरेसा स्कूलचे फादर फेलिक्स लोबो, खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य एम.बी.चौगुले, प्रा. वामन गावडे, आगारप्रमुख कुंभार आणि कर्मचारी उपस्थित होते.
फोटोओळी – अंमली पदार्थ विरोधी मोहिमेंतर्गत शहरात रॅली काढण्यात आली.