गोव्याहुन गोवा बनावटीच्या चोरट्या दारूची वहातूक केल्या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कास- शेर्ले तिठ्यावर पुणे येथील इसमावर कारवाई – – ⭐7 लाख 70 हजार रूपयाच्या मुद्देमालासह दारू जप्त
सुनिता भाईप/ सावंतवाडी-– गोव्याहुन पूण्याला शेर्ले मार्गे गोवा बनावटीच्या चोरट्या दारूची वहातूक होणार असल्याची पक्की खबर राज्य उत्पादन शुल्क विभागाला मीळाली होती.खबर मीळाल्याने अधीक्षक मनोज शेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली कास- शेर्ले तिठ्यावर सापळा रचुन टाटा झेस्ट एम.एच.05-डीके-4497 या कारला अडवुन झडती घेतली.https://sindhudurgsamachar.in/गजानन-बांदेकरचे-स्थापत्य/
झडतीमध्ये कारच्या मागील सिटवर वेगवेगळ्या प्रकारचे गोवाबनावटीचे मद्य सापडुन आले.गोवा बनावटीच्या चोरट्या दारूची वहातूक करत असल्याने 2 लाख 70 हजार रूपये किमंतीची चोरटी दारू, 5 लाख रूपये किमंतीची कार मीळुन 7 लाख रूपयाच्या मुद्देमालासह विनोद अनंत गोपाळघरे वय वर्षे 29 राहाणार पूणे या संशयीत युवकार कारवाई करून ताब्यात घेण्यात आले.सदरची कारवाई प्रदिप रास्कर, निरिक्षक तानाजी पाटील,दु. निरिक्षक गोपाळ राणे,सहा. दुय्यम निरीक्षक रणजी शिंदे यांनी केली.अधीक तपास प्रदिप रास्कर करत आहेत.