प्रतिनिधी- पांडुशेठ साटम
मालवण-माननीय नामदार दीपकभाई केसरकर मित्रमंडळ सावंतवाडी व अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने, महाराष्ट्र राज्याचे कार्यतत्पर शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री माननीय नामदार श्री.दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आhttps://sindhudurgsamachar.in/kokan-नियती-कधी-कधी-खूप-कठोर-बन/
मालवणी मातीतील प्रसिद्ध साहित्यिक मा. श्री.गंगाधर महाम्बरे यांनी लिहिलेले "चम चम चम पुनवेचा, चांद आला गगनी रे "या गीताची ध्वनिमुद्रिका व व्हिडिओ नुकताच अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा, मालवण यांनी अनावरण केला आहे .या गीताला श्री.अमर पवार यांचे संगीत लाभले असून सौ.रश्मी आंगणे यांनी या गीताचे गायन केले आहे.हे गीत शाळाशाळांतील सर्व विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्याही पसंतीस उतरत आहे. अनेक पालक सुद्धा हे गाणं गुणगुणताना दिसत आहेत.अनेक शाळांनी या गीताचे उत्स्फूर्त स्वागत केले असून , नाचून -गाऊन त्याचे व्हिडिओ सुद्धा तयार केलेले आहेत.अनेक शाळांनी या गीताची ध्वनिमुद्रिका वाजवून शालेय वातावरण आनंददायी केले .या उपक्रमाला कथामाला मालवणचे अध्यक्ष श्री. सुरेश ठाकूर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे.
शाळाशाळांमध्ये विद्यार्थी, शिक्षकांच्या मुखी असणाऱ्या या आनंददायी गीतावर ऑनलाईन रेकॉर्ड डान्स स्पर्धा घ्यावी असा मानस मा.दीपकभाई केसरकर मित्र मंडळाच्या वतीने व्यक्त करण्यात आला .
शालेय शिक्षण मंत्री माननीय श्री.दीपकभाई केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दीपकभाई केसरकर मित्र मंडळ सावंतवाडी व अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला तालुका मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने ही ऑनलाईन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तरी या स्पर्धेमध्ये सर्व शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
स्पर्धेचे गट –
गट क्रमांक 1- इयत्ता पहिली ते चौथी.
गट क्रमांक 2- इयत्ता पाचवी ते आठवी.
स्पर्धेची व्याप्ती – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणतीही शाळा या स्पर्धेमध्ये स्वेच्छेने सहभागी होऊ शकते.
*बक्षीसे * – गुणानुक्रमे प्रथम तीन व उत्तेजनार्थ दोन संघांना प्रशस्तीपत्र व रोख पारितोषिक दिले जाईल.
*प्रथम क्रमांक -5005/-
द्वितीय क्रमांक -4004/-
तृतीय क्रमांक – 3003/-
उत्तेजनार्थ एक -1001/-
उत्तेजनार्थ दोन – 1001/-
रेकॉर्ड डान्स केलेल्या व्हिडिओची लिंक deepakkesarkarmitramandal@gmail.com या ई-मेल ला किंवा व्हिडिओ 9422040874 या टेलिग्राम क्रमांकावर पाठवण्याचा अंतिम दिनांक -24 जुलै 2024,
वेळ – रात्री 11 वाजून 59 मिनिटांपर्यंत.
स्पर्धेचे नियम व अटी-
1)स्पर्धेत भाग घेणाऱ्या शाळेने “चम चम चम पुनवेचा चांद आला गगनी रे हे गीत https://youtu.be/RzFw1L6rX3o?si=orsRu3TqGNhqwLaR
या युट्यूब लिंक ला जाऊन डाऊनलोड करावे. याच ध्वनिमुद्रित गाण्यावर शाळेने रेकॉर्ड डान्स बसवावा.
2) हे गीत https://drive.google.com/file/d/1duwi1k6G-a3DhjzOXL9-lIiTV2OYpm_m/view?usp=drivesdk
या लिंकवर सुद्धा उपलब्ध आहे.
3)फक्त याच गाण्यावर रेकॉर्ड डान्स केलेला डान्स स्पर्धेमध्ये स्वीकारला जाईल.
4)कोणताही कलात्मक नृत्यप्रकार स्वीकारला जाईल. उदा. शास्त्रीय नृत्य,लोकनृत्य, पाश्चात्य नृत्य., थीम डान्स …..इत्यादी.
5)व्हिडिओच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेचे नाव, तालुका सांगणे आवश्यक आहे.
6)आपल्या शाळेत आपण आपल्या मित्र-मैत्रिणींचे, गुरुजनांचे वाढदिवस साजरे करतो, शुभेच्छा देतो. महाराष्ट्र राज्याचे कार्यतत्पर शिक्षण मंत्री माननीय नामदार श्री.दीपक केसरकर यांचा वाढदिवस 18 जुलै रोजी आहे.आपल्या शाळेच्या नृत्यचमुकडून माननीय मंत्री महोदयांना शुभेच्छा स्वीकारायला नक्कीच आवडेल. तुमच्या गोड आवाजातील नाविन्यपूर्णरित्या दिलेल्या शुभेच्छा माननीय मंत्री महोदयांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू.रेकॉर्ड डान्स व्हिडीओच्या सुरुवातीला एक मिनिट कालावधी पर्यंत तुम्ही शुभेच्छा देऊ शकता.
7)डान्स मध्ये प्रत्यक्ष स्टेजवर डान्स करणाऱ्या विद्यार्थ्यांची कमाल संख्या 15 असावी.
8) शाळेने रेकॉर्ड डान्स शूटिंग केलेल्या व्हिडिओची लिंक deepakkesarkarmitramandal@gmail.com या ईमेलवर किंवा 9422040874 या टेलिग्राम नंबरवर दिनांक 24 जुलै 2024 रोजी रात्री बारा पूर्वी पाठवावी.
9) शाळेने व्हिडीओ लिंक सोबत शाळेचे नाव,पत्ता, मुख्याध्यापकाचे नाव व मोबाईल नंबर,मार्गदर्शक शिक्षकाचे नाव व मोबाईल नंबर पाठवावा.
10) व्हिडिओचा एकूण कालावधी सहा मिनिटांपेक्षा जास्त होणार नाही याची काळजी घ्यावी.
11) पंचांचा निर्णय अंतिम राहील.
12) यशस्वी विद्यार्थ्यांना माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व रोख पारितोषिक देऊन गौरव केला जाईल.
13) गुणगौरव समारंभाची तारीख,वेळ,ठिकाण अलाहिदा कळविण्यात येईल.
तरी सर्व शाळांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन
श्री. राजन पोकळे, अध्यक्ष मा. श्री.दीपकभाई केसरकर मित्र मंडळ,सावंतवाडी
श्री.सुरेश ठाकूर,अध्यक्ष अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, शाखा मालवण. यांचे वतीने करण्यात आले आहे.