Kokan: अखेर ग्रामसेवकांनी बांधकाम कामगारांना 90 दिवस प्रमाणित दाखला देण्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश

0
25
बांधकाम कामगार, ग्रामसेवक,
अखेर ग्रामसेवकांनी बांधकाम कामगारांना 90 दिवस प्रमाणित दाखला देण्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश

🟣⏩ श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण व स्वाभिमानी कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रसाद गावडे, निवारा बांधकाम संघटना अध्यक्ष मंगेश चव्हाण, रत्नसिंधु बांधकाम संघटना अशोक बावलेकर यांची माहिती
प्राजक्त चव्हाण, प्रसाद गावडे, मंगेश चव्हाण, अशोक बावलेकर यांनी सातत्याने सुरू ठेवला होता पाठपुरावा.

कुडाळ- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळातर्गत नोंदणी व नूतनीकरणासाठी शासनाच्या आदेशांनुसार ग्रामसेवकांनी 90 दिवस काम केल्याचे प्रमाणित दाखले देणे नियमाधीन असताना ग्रामसेवकांनी त्यांस नकार देत संघटनेचा निर्णय सांगून विरोध दर्शविला होता. या संदर्भात प्राजक्त चव्हाण, प्रसाद गावडे, मंगेश चव्हाण, अशोक बावलेकर यांनी कामगार संघटनांच्या वतीने शासन निर्णय मोठा की संघटनेचा निर्णय मोठा असा प्रशासनाला जाब विचारून जिल्हाधिकारीं व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते तसा पत्र व्यवहार देखील करण्यात आला होता. https://sindhudurgsamachar.in/kokan-मालवणमध्ये-मोठी-दुर्घटन/

जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जनता दरबारात त्याची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पूर्ववत दाखले देण्याचे ग्रामसेवकांना निर्देश देण्याच्या सूचना दिल्या होत्या. तरी देखील जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडून टाळाटाळ होत असल्याने श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण व स्वाभिमानी कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी 29 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद भवना समोर आंदोलना इशारा दिल्यानंतर अखेर जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाला जाग आली आहे. जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना ग्रामसेवकांना दाखले देण्याचे निर्देश देण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी श्री देशमुख यांनी पत्राद्वारे दिले आहेत.

यापुढे गावागावातील गोरगरीब कष्टकरी कामगारांना दाखले देऊन ग्रामसेवकांनी सहकार्य करण्याचे आवाहन ग्रामसेवक संघटनेला करण्यात येत असून यापुढे दाखले देण्यास टाळाटाळ करणाऱ्यांविरोधात प्रसंगी त्या त्या गावात जाऊन तीव्र आंदोलन छेडणार असल्याची माहिती स्वाभिमानी कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रसाद गावडे, प्राजक्त चव्हाण, मंगेश चव्हाण, अशोक बोवलेकार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here