वेंगुर्ला प्रतिनिधी-श्री देवी सातेरी कला क्रीडा मंडळ अणसूर यांच्यावतीने गावात मोफत इंग्लिश स्पिकिंग कोर्स सुरू करण्यात आला असून या क्लासचे उद्घाटन प्रसिद्ध आंबा बागायतदार विजय सरमळकर यांच्या हस्ते करण्यात आले.https://sindhudurgsamachar.in/kokan-तुळस-येथे-शाळांसाठी-विवि/
यावेळी व्यासपिठावर उद्योजक नाथा गावडे, सामाजिक कार्यकर्ते गोपी गावडे, आपा गावडे, बिटू गावडे, विजय गावडे, जयवंत अकॅडमिचे कांबळी सर, देविदास गावडे, उदय गावडे, बाबी गावडे, संदेश गावडे, प्रभाकर गावडे, कुमार गावडे तसेच मंडळाचे अध्यक्ष नितीन अणसुरकर, उपाध्यक्ष सुनील गावडे, खजिनदार सिद्धेश गावडे सचिव गजमुख गावडे, भाऊ मालवणकर तसेच सर्व सदस्य व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
या क्लासेसमध्ये अणसूर गावातील एकूण ३० मुलांनी सहभाग घेतला. बिटू गावडे यांच्याकडून वह्या वाटप करण्यात आले. यावेळी गावात शैक्षणिक व क्रीडात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा श्री देवी सातेरी कला क्रीडा मंडळाचा मानस आहे असल्याचे मंडळाच्यावतीने सांगण्यात आले.
फोटोओळी – अणसूर येथील इंग्लिश स्पिकिंग कोर्सच्या शुभारंभप्रसंगी मान्यवर उपस्थित होते.