Kokan: अनिकेत पटवर्धन यांनी विजयाचे शिल्पकार, समर्थ नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार

0
19
अनिकेत पटवर्धन यांनी विजयाचे शिल्पकार, समर्थ नेतृत्व देवेंद्र फडणवीस
अनिकेत पटवर्धन यांनी विजयाचे शिल्पकार, समर्थ नेतृत्व देवेंद्र फडणवीस

फडणवीस यांनीही महायुती समन्वयक म्हणून अनिकेतचेही केले अभिनंदनमुख्यमंत्री पदासाठी दिल्या शुभेच्छा
🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार –
रत्नागिरी- भारतीय जनता पक्षाचे युवा नेते आणि कोकणातील महायुतीचे समन्वयक अनिकेत पटवर्धन यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगला येथे भेट घेतली. महायुतीच्या विजयाबद्दल आभार मानले आणि अभिनंदन करून मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्रजीना शुभेच्छा दिल्या.https://sindhudurgsamachar.in/latest-e-paper/

रत्नागिरीतील युवा नेते तसेच मंत्री रवींद्र चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक असलेले अनिकेत पटवर्धन यांनी आज श्री. फडणवीस यांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीत राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने 233 जागा जिंकून प्रचंड यश मिळवले. या यशाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे आज त्यांची भेट घेतली.

अनिकेत पटवर्धन यांनी पडद्याआड राहून सूत्रे हलवली. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, भिवंडी जिल्ह्याचे महायुतीचे समन्वयक म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी होती. कोकणामध्ये महायुती टिकवण्यासाठी महायुतीचा समन्वयक म्हणून कामगिरी केली. रत्नागिरी, राजापूर, दापोली आणि चिपळूण या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी होण्यामागे समन्वयक अनिकेत पटवर्धन यांचा सिंहाचा आणि मोलाचा वाटा होता, हे नाकारून चालणार नाही.

युती अभेद्य ठेवणे व पार्टीच्या कार्यकर्त्यांना एकसंघ ठेवणे, रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाचा आणि पार्टीच्या विचारधारेबरोबर सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित ठेवणे, महायुती म्हणून मतदान करण्याच्या दृष्टीने संपूर्ण ताकद आणि व्यूहरचना आखली. तसेच या लोकसभा आणि आता विधानसभा विजयामध्ये चांगल्या पद्धतीने अनिकेत पटवर्धन यांनी संयमी व उत्तमरित्या जी भूमिका बजावली, त्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

पडद्यामागे राहून भारतीय जनता पार्टी एकसंधपणे टिकण्यासाठी व सगळ्या नेत्यांना एकत्रित ठेवणे व कार्यकर्त्यांना रवींद्र चव्हाण यांच्याबरोबर फोनवर संपर्क साधून देणे व त्या त्या ठिकाणी भेटीगाठी करून देणे ही फार उत्तमपणे जबाबदारी पार पाडली. याबद्दल अनिकेत पटवर्धन यांच्यावर सर्व महायुतीच्या नेत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी पुढील 25 वर्ष अनिकेत पटवर्धन काम करेल. रवींद्र चव्हाण यांच्यासारखी भारतीय जनता पार्टी पुढे चालवतील, अशी आशा कार्यकर्त्यांच्या मनात निश्चितच आता तयार होईल. अनिकेत पटवर्धन यांचे केंद्रीय नेतृत्वाशी असलेले संबंध, राज्यातील असलेले संबंध व रत्नागिरी व इतर अनेक जिल्ह्यातील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये कार्यकर्ता कसा असावा, याचे उत्तम उदाहरण म्हणून देवेंद्रजी व रवींद्र चव्हाण यांनी अनिकेत पटवर्धन यांचे कौतुक केले. कोकणातलं भविष्यातलं एक चांगलं नेतृत्व म्हणून रवींद्र चव्हाण व देवेंद्रजींनी एक चांगला हिरा शोधलाय, असं म्हणायला हरकत नाही. तसेच चाणक्य नीति काय असू शकते याचं मूर्तिमंत उदाहरण, कोणत्याही फोटोची अपेक्षा नाही, कोणतताही बडेजाव न करता पडद्याच्या मागे राहून शांतपणे संयमीपणे सगळं काम कशा पद्धतीने करू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणून अनिकेत पटवर्धन यांच्याकडे पाहिलं जातंय. देवेंद्रजींनी तसेच रवींद्र चव्हाण यांनी दाखवलेल्या विश्वासास अनिकेत पटवर्धन पात्र ठरतील, असं रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यकर्ते म्हणत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here