– ⭐स्टारप्रचारकांची गरजच नाही..समस्त ग्रामिण महिला वर्ग एकवटला – ⭐ गावातील वाडीवाडीत महीला करीत आहे अर्चना ताईंचा प्रचार –
दोडामार्ग/प्रतिनिधी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्यावतीने महिला नेतृत्व म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरद पवार पक्षाच्यावतीने उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी केली होती. पण पक्षाने उमेदवारी दिली नाही. महाविकास आघाडीच्यावतीने भाजपा मधून उबाठा शिवसेनामध्ये दाखल झालेल्या राजन तेली यांना उमेदवारी दिली. यामुळे निराश झालेल्या अर्चना घारे परब यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. दोडामार्ग तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसची एक टिम यांनी अर्चना घारे परब यांच्या प्रचारा ला सुरूवात केली आहे.http://अर्चना घारे परब यांच्या प्रचाराला धुमधडाक्यात सुरूवात
दोडामार्ग तालुक्यात अनेक गावात गेल्या दोन तीन वर्षात अर्चना घारे परब यांनी अनेक महिलांशी संपर्क साधला आहे. अनेक महिलांनी त्यांना प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे यावेळी त्यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे महाविकास आघाडीच्यावतीने सावंतवाडी मतदार संघातून उमेदवारी दिली जावी अशी मागणी केली पण दखल घेतली नाही. यामुळे अर्चना घारे परब यांनी आपला अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. सावंतवाडी मतदार संघात चौरंगी लढत आणि ती देखील अटीतटीची होणार आहे. या मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरी झाली आहे. अर्चना घारे परब, तसेच भाजपाचे विशाल परब यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. दोन्हीकडे मतांची विभागणी होणार आहे. दोडामार्ग तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे दोडामार्ग तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी यांनी पक्ष बाजूला ठेवून एक टिम तयार केली आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून हे पदाधिकारी व कार्यकर्ते अनेक गावात जाऊन अर्चना घारे परब यांचा प्रचार करत आहेत.