कसालच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली रत्नागिरी येथील रेल्वे कार्यालयात क्षेत्रिय रेल्वे प्रबंधक श्री.रविंद्र कांबळे यांची भेट
कुडाळ– कसाल रेल्वेस्थानक मंजूर करण्याबाबत कसाल रेल्वेस्थानक संघर्ष समिती-कसाल च्या वतिने रत्नागिरी येथे क्षेत्रिय रेल्वे प्रबंधक श्री.रविंद्र कांबळे यांना कसाल ग्रामपंचायत सहीत १९ ग्रामपंचायत चे मासिक सभा/ग्रामसभा ठराव आणि सुमारे १३५० नागरीकांचे सही असलेले निवेदन सादर करण्यात आले. कसाल रेल्वेस्थानक झाले तर कोणकोणते फायदे कोकण रेल्वेप्रशासनाला व कसाल दशक्रोशितील गावातील नागरीकांना होउ शकतात यावर चर्चा करून क्षेत्रिय रेल्वे प्रबंधक श्री.रविंद्र कांबळे यांना माहिती देण्यात आली. https://sindhudurgsamachar.in/kokan-आजचा-निकाल-ऐतिहासिक-शिव/
यावेळी रत्नागिरी क्षेत्रिय प्रबंधक कार्यलयाचे जनसंपर्क अधिकारी श्री.सचिन देसाई कसाल रेल्वेस्थानक संघर्ष समिती-उपाध्यक्ष श्री.संजय वाडकर, सचिव-कु.साईनाथ आंबेरकर, खजिनदार-श्री.गणपत कसालकर,कसाल रेल्वेस्थानक संघर्ष समिती-कायदे सल्लागार श्री.नंदन वेंगुर्लेकर,सल्लागार श्री.सायमन फर्नांडिस, कसाल माजी सरपंचश्री.निलेश कामतेकर,समिती सदस्य बाळा सातार्डेकर,वैभववाडी रेल्वेस्थानक संघटनेचेचे श्री.महेश रावराणे,किशोर जैतापकर,श्री पंडित रावराणे, कणकवली रेल्वेस्थानक प्रवासी संघटनेचे श्री.संतोष नाईक,कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीचे खजिनदार कु.मिहिर मठकर,सदस्य श्री.तेजस पोयेकर श्री.सुभाष शिरसाट,मडूरा रेल्वेस्थानक प्रवासी संघटनेचे अध्यक्ष श्री.गुरुदास गवंडे,श्री.वसंत धरी,श्री.सुरेश गावडे, वेंगुर्ला येथुन श्री.जाफर शेख आणी कोकण रेल्वेचे अधिकरी उपस्थित होते.