Kokan: आकाश फिश मिल अँड फिश ऑईल प्रा.लि.केळुस या कंपनीमुळे होणाऱ्या त्रासाबाबत उद्या दि.१६ ऑगस्ट रोजी सकाळी ११-३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय ओरोस येथे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीचे आयोजन

0
25
दीपक केसरकर
आकाश फिश मिल अँड फिश ऑईल प्रा.लि.केळुस या कंपनीमुळे होणाऱ्या त्रासाबाबत उद्या दि.१६ ऑगस्ट रोजी सकाळी ११-३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय ओरोस येथे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीचे आयोजन

सिंधुदुर्ग:-आकाश फिश मिल अँड फिश ऑईल प्रा.लि.केळूस या कंपनीच्या दुषित पाण्यामुळे दुर्गंधी पसरत असल्यामुळे ग्रामस्थांनी व लोकांनी शासनाला दिलेल्या निवेदनाच्या पार्श्‍वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखालील उद्या शुक्रवार दि.१६ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११-३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय ओरोस येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-आजगाव-भोमवाडी-ग्रामसेवि/

केळूस ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात माळरानावर आकाश फिश मिल अँड फिश ऑईल कंपनी लि.केळूस ही खाजगी कंपनी स्थापीत असून सदर कंपनीमध्ये माशांवर प्रक्रिया केली जाते.सदर प्रक्रिये दरम्यान निर्माण झालेले नाशिवंत पाणी कंपनीने माळरानावर मोठ्या टाक्या खोदून तेथे साठवून ठेवले जाते.पावसाळ्यामध्ये सदर साठवलेले पाणी मोठ्या पाईपद्वारे म्हापण ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील खवणे खाडीपर्यत येणाऱ्या ओहोळात सोडले जाते.दि.२७ जून २०२४ रोजी मोठ्या पावसाचा फायदा घेत कंपनीने सदरचे साठवून ठेवलेले नाशिवंत पाणी पाईपद्वारे खवणे खाडीपात्रामध्ये सोडले असून,त्यामुळे खाडीतील पाणी रसायनयुक्त फेसाळलेले व अतिशय घाण झालेले आहे.या घाण झालेल्या पाण्यामुळे संपूर्ण खवणे यरिसरात दुर्गंधी पसरलेली आहे.तसेच खाडीपात्रातील मासे या दूषित पाण्यामुळे मेलेले असून, त्यामुळे पावसाळी हंगामात स्थानिक लोकांचे मासेमारीचे रोजीरोटीचे साधन नष्ट झाले आहे.तसेच सदरचे पाणी खाडीनजिक असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरींमध्ये जावून त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण होणार असलेबाबत ग्रामस्थांचे निवेदन प्राप्त झाले आहे.

याबाबत आकाश फिश मिल अँड फिश ऑईल प्रा.लि.केळूस,ता.वेंगुर्ला या कंपनीमुळे आजूबाजूच्या गावातील लोकांना होणाऱ्या त्रासाबाबत मा.शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दिनांक १६ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११-३० वा. जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.तरी सदर बैठकीस आवश्यक माहितीसह वेळेत उपस्थित राहावे.असे लेखी पत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यांचे अपर जिल्हादंडाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी १४ ऑगस्ट २०२४ रोजी काढले आहे.

दरम्यान अपर जिल्हादंडाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी वरील पत्राच्या प्रती १)मा.मंत्री शालेय शिक्षण,मराठी भाषा,महाराष्ट्र राज्य,२)मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग,३)उपविभागीय अधिकारी सावंतवाडी, ४)उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, ५)तहसिलदार वेंगुर्ला,सावंतवाडी, ६)सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय सिंधुदुर्ग,७ )प्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूर, ८)उपप्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ रत्नागिरी, ९)गटविकास अधिकारी वेंगुर्ला,सावंतवाडी १०)व्यवस्थापक, आकाश फिशमिल व फिशऑईल प्रा.लि.केळूस,११)ग्रामसेवक, ग्रामपंचायत म्हापण,केळुस ता.वेंगुर्ला,१२)सरपंच,प्रतिनिधी, ग्रामपंचायत, म्हापण व केळुस ता. वेंगुर्ला

आकाश फिश मिल अँड फिश ऑईल प्रा.लि.केळुस या कंपनीमुळे होणाऱ्या त्रासाबाबत उद्या दि.१६ ऑगस्ट रोजी सकाळी ११-३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय ओरोस येथे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीचे आयोजन… 🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार – सिंधुदुर्ग:-;-आकाश फिश मिल अँड फिश ऑईल प्रा.लि.केळूस या कंपनीच्या दुषित पाण्यामुळे दुर्गंधी पसरत असल्यामुळे ग्रामस्थांनी व लोकांनी शासनाला दिलेल्या निवेदनाच्या पार्श्‍वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखालील उद्या शुक्रवार दि.१६ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११-३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय ओरोस येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. केळूस ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात माळरानावर आकाश फिश मिल अँड फिश ऑईल कंपनी लि.केळूस ही खाजगी कंपनी स्थापीत असून सदर कंपनीमध्ये माशांवर प्रक्रिया केली जाते.सदर प्रक्रिये दरम्यान निर्माण झालेले नाशिवंत पाणी कंपनीने माळरानावर मोठ्या टाक्या खोदून तेथे साठवून ठेवले जाते.पावसाळ्यामध्ये सदर साठवलेले पाणी मोठ्या पाईपद्वारे म्हापण ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील खवणे खाडीपर्यत येणाऱ्या ओहोळात सोडले जाते.दि.२७ जून २०२४ रोजी मोठ्या पावसाचा फायदा घेत कंपनीने सदरचे साठवून ठेवलेले नाशिवंत पाणी पाईपद्वारे खवणे खाडीपात्रामध्ये सोडले असून,त्यामुळे खाडीतील पाणी रसायनयुक्त फेसाळलेले व अतिशय घाण झालेले आहे.या घाण झालेल्या पाण्यामुळे संपूर्ण खवणे यरिसरात दुर्गंधी पसरलेली आहे.तसेच खाडीपात्रातील मासे या दूषित पाण्यामुळे मेलेले असून, त्यामुळे पावसाळी हंगामात स्थानिक लोकांचे मासेमारीचे रोजीरोटीचे साधन नष्ट झाले आहे.तसेच सदरचे पाणी खाडीनजिक असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरींमध्ये जावून त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण होणार असलेबाबत ग्रामस्थांचे निवेदन प्राप्त झाले आहे. याबाबत आकाश फिश मिल अँड फिश ऑईल प्रा.लि.केळूस,ता.वेंगुर्ला या कंपनीमुळे आजूबाजूच्या गावातील लोकांना होणाऱ्या त्रासाबाबत मा.शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दिनांक १६ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११-३० वा. जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.तरी सदर बैठकीस आवश्यक माहितीसह वेळेत उपस्थित राहावे.असे लेखी पत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यांचे अपर जिल्हादंडाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी १४ ऑगस्ट २०२४ रोजी काढले आहे. दरम्यान अपर जिल्हादंडाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी वरील पत्राच्या प्रती १)मा.मंत्री शालेय शिक्षण,मराठी भाषा,महाराष्ट्र राज्य,२)मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग,३)उपविभागीय अधिकारी सावंतवाडी, ४)उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, ५)तहसिलदार वेंगुर्ला,सावंतवाडी, ६)सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय सिंधुदुर्ग,७ )प्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूर, ८)उपप्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ रत्नागिरी, ९)गटविकास अधिकारी वेंगुर्ला,सावंतवाडी १०)व्यवस्थापक, आकाश फिशमिल व फिशऑईल प्रा.लि.केळूस,११)ग्रामसेवक, ग्रामपंचायत म्हापण,केळुस ता.वेंगुर्ला,१२)सरपंच,प्रतिनिधी, ग्रामपंचायत, म्हापण व केळुस ता. वेंगुर्ला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here