Kokan: आतंकवादविरोधी पथकाने चिपळुण तालुक्यातील खेर्डीसह शहरातील मार्कंडी परिसरातून ४ बांगलादेशी घुसखोरांना अटक

0
31
बांगलादेशी घुसखोर अटक
चिपळुण तालुक्यातील खेर्डीसह शहरातील मार्कंडी परिसरातून ४ बांगलादेशी घुसखोर अटक

चिपळूण-: रत्नागिरी आतंकवादविरोधी पथकाने तालुक्यातील खेर्डीसह शहरातील मार्कंडी परिसरातून 4 बांगलादेशी घुसखोरांना अटक केली. हे घुसखोर बंगालमार्गे कोलकात्याहून महाराष्ट्रात घुसल्याचे पोलीस गुन्हा अन्वेषण शाखेने उघड केले आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-चंद्रनगर-क्रिकेट-स्पर्ध/

या बांगलादेशींकडे कोणतीही कागदपत्रे सापडली नसल्याने त्यांनी अवैधरित्या भारतात प्रवेश केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध पारपत्र भारत प्रवेश नियम 1950 चा नियम 3 सह 6 परकीय नागरिक आदेश 1948 परि.3 (1) अ, परकीय नागरिक आदेश 1946 कायदा कलम 14 सह गुन्हा नोंदवेला आहे. काही दिवसांपूर्वी रत्नागिरी आतंकवादविरोधी पथकाने शहराजवळील खेर्डी येथून बांगलादेशी पती-पत्नीला अटक केली होती. यानंतर लगेचच आणखी 2 बांगलादेशींना अटक करण्यात आली. रत्नागिरी आतंकवादविरोधी पथकाने तालुक्यातील खेर्डीसह शहरातील मार्कंडी परिसरातून 4 बांगलादेशी घुसखोरांना अटक केली. हे घुसखोर बंगालमार्गे कोलकात्याहून महाराष्ट्रात घुसल्याचे पोलीस अन्वेषणातून उघड झाले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here