🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार -वेंगुर्ला/ प्रतिनिधी-
किर्लोस केंद्रामार्फत पिल्लांचा पुरवठा केला जात आहे. परसबागेतील हे सुधारीत कोंबडीपालन करून आपले उत्पन्न वाढवा असे आवाहन वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख बाळकृष्ण गावडे यांनी प्रशिक्षणार्थींना केले.https://sindhudurgsamachar.in/kokan-मी-जनतेला-कधीच-खोटी-स्वप्
किर्लोस कृषी विज्ञान केंद्रामार्फत तुळस येथे पाच दिवस कालावधीचे परसबागेतील सुधारीत तंत्रज्ञानावर आधारित कुक्कुटपालन प्रशिक्षण घेण्यात आले. याचे उद्घाटन सरपंच रश्मी परब यांच्या हस्ते झाले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य जयंत तुळसकर, वेताळ प्रतिष्ठानचे प्रा.सचिन परुळकर, सर्पमित्र महेश राऊळ, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख बाळकृष्ण गावडे, तज्ज्ञ प्रशिक्षक डॉ. केशव देसाई उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना श्री. गावडे म्हणाले की, सध्या देशी कोंबड्यांच्या मांसाला व अंड्याला फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे. परंतु, त्याचा पुरवठा फारच कमी आहे. त्यामुळे बाजाराची मागणी पूर्ण होत नाही. यासाठी किर्लोस केंद्रामार्फत अधिक उत्पनन देणा-या गिरीराज, वनराज, कावेरी, श्रीनिधी, ग्रामप्रिया, काला असिल, पिला असिल, कलिगा ब्राऊन आदी सुधारीत जाती प्रसारीत केल्या आहेत. उत्पन्न वाढीसाठी याचा उपयोग करून घ्यावा असे आवाहनही केले.
तज्ज्ञ प्रशिक्षक डॉ.केशव देसाई यांनी कोंबड्यांच्या सुधारित जाती, उत्पादन क्षमता, शारीरिक वैशिष्ट्ये, कोंबडी घराचे व्यवस्थापन, कोंबडी घराची स्वच्छता, कोंबड्यांचे विविध आजार व उपचार, लसीकरण, पाणी व खाद्य व्यवस्थापन, कोंबड्यांचे लसीकरण प्रात्यक्षिके, कोंबडी घराची बांधणी करताना घ्यावयाची काळजीबाबत प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणाचा लाभ तुळस, होडावडे, अणसुर, वेतोरे, उभादांडा या गावातील २५ महिला व युवकांनी घेतला
तुळस गावात कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन सरपंच रश्मी परब यांनी दिले. विज्ञान केंद्रामार्फत राबविण्यात येणारी सर्व प्रकारची कृषी विषयाची प्रशिक्षणे तुळस पंचक्रोशीमध्ये आयोजनासाठी सहकार्य आपले सहकार्य राहील असे प्रा. सचिन परूळकर यांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या कृषीकन्या सलोनी चौगुले, नेहा शेलार, प्रचिती भगत, दक्षता शेलार, लक्षिता कुसगावकर, सर्पमित्र महेश राऊळ, सुधीर चूडजी व गोविंद भणगे आदींच सहकार्य लाभले. सर्व प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.