🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार
कणकवली, दि-२२:- राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई, उच्च न्यायालय मुंबई आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग यांच्या निर्देशानुसार दिवाणी न्यायालय, कणकवली येथे शनिवार, १४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-मासेमारी-नौकांवर-कॅमेरे/
दिवाणी न्यायालयातील प्रलंबित दिवाणी व फौजदारीकडील प्रकरणे तसेच राष्ट्रीयकृत बँक, सहकारी बँक, स्वायत्त संस्था ग्रामपंचायतीकडील वादपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटवायची आहेत, त्यांनी ती तालुका विधी सेवा समिती कणकवलीकडे दाखल करावीत. ज्यांना त्यांची प्रकरणे चर्चेद्वारे मिटवायची असतील, त्यांनी वादपूर्व चर्चेसाठी या न्यायालयात उपस्थित राहवे, असे आवाहन दिवाणी न्यायाधीश, कणकवली तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष टी. एच. शेख व सहदिवाणी न्यायाधीश कणकवली एम. बी. सोनटक्के यांनी केले आहे.