कशेडी कंत्राटदाराच्या कार्यालयाला टाळे; गणपतीपूर्वी बोगद्यातून वाहतूक होण्याबाबत शंका
पोलादपूर : गणेशोत्सवापूर्वी कोकणात जाण्यासाठी मुंबई – गोवा महामार्गावरील कशेडी घाट बोगद्यातून एकेरी वाहतुकीसाठी हालचाली सुरू असताना या बोगद्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-न्यू-इंग्लिश-स्कूल-उभादा/
भोगाव ग्रामपंचायतीचा कर थकविल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे या बोगद्यातून वाहतूक होणार का, याबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे. मात्र, बोगद्याचे काम करीत असलेल्या शिंदे डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीच्या तीन कार्यालयांना भोगाव ग्रामपंचायतीने टाळे ठोकले आहे. भोगाव ग्रामपंचायत सरपंच प्रियांका कदम, माजी सरपंच राकेश उतेकर ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेविका यांनी शिंदे डेव्हलपर्स कंपनी कार्यालयात जाऊन ही कारवाई केली.
हलक्या वाहनांसाठी सोमवारपासून खुलाकोकणातील मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटाला आता बोगद्यातून वाहतुकीचा पर्याय लवकरच उपलब्ध होणार आहे. सोमवारपासून एक बोगदा हलक्या वाहनांसाठी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली होती.
यावेळी तहसीलदार आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. कराच्या एकूण रकमेच्या ५० टक्के रक्कम भरण्याची मागणी ग्रामपंचायतीने केली. मात्र, कंपनीने कोणत्याही प्रकारे ती रक्कम देण्यास नकार दिला. त्यामुळे तोडगा निघाला नाही. अखेर ग्रामपंचायतीने तीनही कार्यालये सीलबंद केलीत. या कारवाईमुळे बोगदा सुरू होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे