सावंतवाडी : काजू बिला प्रति किलो दहा रुपये अनुदान आणि हमीभाव प्रमाणे खरेदी करण्याबाबत काजू बोर्डाने अंमलबजावणी केली पाहिजे याबाबतचे मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत आचारसंहितेपूर्वी ठराव झालेले आहेत त्यामुळे कोणीही दिशाभूल करू नये असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले https://sindhudurgsamachar.in/kokan-आ-सन्मा-वैभवजी-नाईक-साहे/
ते म्हणाले,सिंधूरत्न योजनेतून शेळ्या मेंढ्या दिल्या आणि त्यांचा विमा काढण्यापूर्वी मृत्यू झाल्यास त्या परत देण्याची ठेकेदाराची जबाबदारी आहे. कंपनी विमा उतरवेल त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही. काजू बी हमीभावाने खरेदी करण्याबाबत कॅबिनेटमध्ये बैठकीत ठराव होऊन त्याची अंमलबजावणी काजू बोर्ड करेल, हे आचारसंहितेपूर्वी ठरले आहे. असे केसरकर यांनी सांगितले. काजू बोंडू रस काढण्यासाठी अजूनही यंत्र दिली नाही, प्रशिक्षणही दिले नाही आणि टीका केली जात आहे. यंत्रे दिली नाही त्यामुळे बोंडे रस काढणाऱ्यांच्या मागे पोलीस कसे मागे लागतील ? असा प्रश्न करून टीका करणाऱ्यांचा केसरकर यांनी समाचार घेतला. बोंडु सिरप एकत्रित करून मार्केटिंग करण्यात येईल काजू शेती ही हंगामी आहे त्यामुळे हा हंगाम गेला तर बोंडू सिरप काढणे अशक्य होईल असेही ते म्हणाले