🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार – सावंतवाडी
कुणकेरी व आंबेगाव गावातील शेतकरी, बागायतदार यांच्यासाठी हवामान केंद्र सावंतवाडी असल्याने या केंद्रावर नोंद होत नसल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे कुणकेरी गावात हवामान केंद्र बसविण्यात यावे, अशी मागणी प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्याकडे करण्यात आली.https://sindhudurgsamachar.in/latest-e-paper/
उपविभागीय महसूल अधिकारी यांना माजी पं. स. सभापती व सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक प्रमोद सावंत, कुणकेरी सरपंच सौ. सोनिया सावंत, आंबेगाव सरपंच संजू परब, कुणकेरी माजी सरपंच विश्राम परब यांनी निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे. -या निवेदनात म्हटले आहे, आंबा व काजु पिकासाठी महसुल मंडळातील प्रधानमंत्री फसल बिमा योजनेअंतर्गत पुनस्थितीत हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना लागु करण्यात आली आहे. महसुल मंडळ स्तरावर असलेल्या शासकिय हवामान केंद्रावरील आकड्याद्वारे नुकसान भरपाई अंतिम केली जाते. गेल्यावर्षी सन 2023-24 साठी सावंतवाडी मंडळात कुणकेरी, आंबेगांव गाव समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यासाठी हवामान केंद्र सावंतवाडी येथे आहे. कुणकेरी व आंबेगाव गावे सावंतवाडी केंद्रापासुन 6 ते 9 किलोमीटर दुर असल्यामुळे हवामान केंद्रामध्ये नोंदी झाल्या नाहीत. त्यामुळे आमच्या गावातील शेतकऱ्यांना विमा संरक्षण खर्चाचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक व मानसिक नुकसान झाले आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-बाबू-घाडीगांवकर-यांच्या/
कुणकेरी व आंबेगाव गावाच्या सिमेला लागुन असलेल्या कोलगांव, माडखोल, सांगेली, कारीवडे या गावात सदर योजनेचा लाभ मिळतो आहे. हवामान केंद्र सावंतवाडी मंडळ मध्ये नोंद होत नसल्याने आंबा व काजू बागायतदारांचे नुकसान झाले असून मनस्ताप सहन करावा लागला आहे. तरी कुणकेरी, आंबेगांव या गावांच्या मध्यभागी हवामान केंद्र करण्यात यावे आणि आम्हां शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे अशी मागणी माजी सभापती प्रमोद सावंत, कुणकेरी सरपंच सौ सोनिया सावंत, आंबेगाव सरपंच संजू परब यांनी केली आहे.