Kokan : कृषी ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित न करण्याचा निर्णय

0
100

वेंगुर्ला प्रतिनिधी- कृषी ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित न करणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे. तशा आशयाचे पत्र महावितरणातील देयक व महसूल विभागाच्या मुख्य अभियंता यांनी सर्व सं व सु परिमंडळाच्या मुख्य अभियंता, सर्व सं व सु मंडळाच्या अधिक्षक अभियंता तसेच सर्व सं व सु विभाग महावितरणच्या कार्यकारी अभियंता यांना दिले आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-ग्रामपंचायत-निवडणूकीसा-2/

काही दिवसांपूर्वी बागायतदारनर्सरी संघटना सिंधुदुर्गच्यावतीने शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतक-यांच्या विशेषतः फळ बागायतदार तसेच नर्सरीधारक यांच्या शेती पंपाची भरारी पथकाद्वारे तपासणी करण्यात येत असून त्यांना अयोग्य निकष लावून भरमसाठ बिले आकारली जात आहे. तसेच पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे सुमारे १० वर्षे मागे जाऊन बिले काढून बिल वसूल केले जात आहे. या अशा अंमलबजावणीमुळे जिल्ह्यातील बहुत्वांशी शेतकरी मेटाकुटीला आला असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन कोकणातील शेतकरीनर्सरीबागायतदार यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही अशी ग्वाही मंत्री दीपक केसरकर यांनी दिले होते.

दरम्यानमहावितरणातील देयक व महसूल विभागाच्या मुख्य अभियंता यांनी कृषी पंप ग्राहकांचा वीजपुरवठाचालू बिल किवा थबबाकी वसुलीकरीता तसेच इतर कोणत्याही कारणास्तव पुढील आदेशापर्यंत खंडित केला जाणार नाही असा निर्णय घेतल्याचे संबंधितांना लेखी पत्राद्वारे कळविले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व बागायतदारशेतकरीनर्सरीधारक यांनी आमदार दीपक केसरकर यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here