कोकण रेल्वेच्या भरतीसाठी फॉर्म भरण्याची मुदत २१/१०/२०२४ रात्री २३:५९ पर्यंत वाढविण्यात आली आहे. सर्व कोकणी रहिवाशांनी आपली शैक्षणिक पात्रता आणि वय तपासून योग्य त्या वर्गवारीत आपले आवेदन भरावे असे आवाहन करण्यात आले आहे. https://sindhudurgsamachar.in/latest-e-paper/
कोकण रेल्वेत भरतीसाठी पुढीलप्रमाणे प्राधान्य देण्यात येते:
१. प्रकल्पग्रस्त (यासाठी प्रकल्पग्रस्त दाखला आवश्यक)
२. कोकण रेल्वे मार्गावरील जिल्ह्यांतील (रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग) एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये नोंदणीकृत उमेदवार (यात नोंदणी करण्यासाठी पुढील लिंकवर दिलेल्या माहितीचा आधार घ्यावा rojgar.mahaswayam.gov.in/Assets/Frontend/assets/user_manuals/jobseeker/Jobseeker%20Registration.pdf आणि https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index वर जाऊन नोंदणी करावी)
३. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातील रहिवासी (यासाठी वास्तव्याचा दाखला – Domicile Certificate काढणे श्रेयस्कर)
फॉर्म भरण्यासाठी लिंक:
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/1893/90834/Index.html
…………………………………….