Kokan: कोंडगे लघु पाटबंधारे योजनेच्या बुडीत क्षेत्र सांडवा प्रकल्पात लाखोंचा भ्रष्टाचार

0
199
कोंडगे लघु पाटबंधारे योजनेच्या बुडीत क्षेत्र सांडवा प्रकल्पात लाखोंचा भ्रष्टाचार
कोंडगे येथील प्रकल्प बाधित गंगाधर कोंडगेकर व ग्रामस्थांची मागणी

संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाल्याशिवाय कोणालाही मोबदला अदा करू नये
⭐कोंडगे येथील प्रकल्प बाधित गंगाधर कोंडगेकर व ग्रामस्थांची मागणी


लांजा (प्रतिनिधी) : तालुक्यातील कोंडगे येथील लघु पाटबंधारे योजनेच्या बुडीत क्षेत्र सांडवा प्रकल्प आणि पुच्छ कालव्यासाठी भूसंपादन करण्यात आलेल्या प्रकरणात लाखोंचा भ्रष्टाचार झाला आहे. यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरून जमीन एजंटांनी भरसमाट मोबदला हडप करून सरकारी तिजोरीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणालाही भूसंपादनाचा मोबदला अदा करू नये, अशी मागणी कोंडगे येथील गंगाधर सिताराम कोंडगेकर यांनी केली आहे.याबाबतची तक्रार त्यांनी उपविभागीय अधिकारी राजापूर यांच्याकडे केली आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-साताऱ्याच्या-पोरीनं-pm-मो/

याबाबत माहिती देताना ग्रामस्थ गंगाधर कोंडगेकर यांनी सांगितले की, कोंडके येथे बुडीत क्षेत्र सांडवा प्रकल्प आणि पुच्छ कालव्यासाठी भूसंपादन लघुपाटबंधारे विभागामार्फत करण्यात आले आहे. जागा व तिचे क्षेत्रफळ त्यामध्ये बराच फरक दिसून येत आहे. संपादित केलेल्या जागेची २०१३ नंतर गावातील व गावाबाहेर काही व्यक्तींनी जमिनी खरेदी करून त्या जागेत काजूच्या झाडांची लागवड केली आणि त्यानंतर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी व कृषी अधिकाऱ्यांशी जवळीक वाढूवून खरेदी केलेल्या जागेची भरसमाट रक्कम मंजूर करून घेण्यात आली आहे, असा आरोप कोंडगेकर यांनी केला आहे.

ज्या गरीब शेतकऱ्यांची एक ते दोन हेक्टर पर्यंत जमीन बुडीत क्षेत्रात गेली त्यांना तुटपुंजे रकमेचा मोबदला रक्कम मंजूर करण्यात आली. ज्या पाटबंधारे विभागाने जमीन संपादित केली तिचा सर्वे करताना भूमी अभिलेख लांजा, यांनी पाटबंधारे विभागाचे अधिकारी जसे सांगतील त्याप्रमाणे कमी जास्त प्रमाणात गुंठ्याचे क्षेत्र दाखवून काही गरीब शेतकऱ्यांच्या पूर्ण जमिनी बुडीत क्षेत्रात गेलेल्या असताना त्या निम्म्या व त्याहून कमी प्रमाणात दाखवण्यात आल्या. मात्र एजंट लोकांच्या जमिनी कमी प्रमाणात असताना त्यांना मात्र भरसमाट
रक्कम मोबदला म्हणून मंजूर करण्यात आली आहे.

दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी संपादित जमीन व त्यात क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात झाडांची लागवड दाखवून शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे कोंडगेकर यांनी सांगितले. कोंडगे येथील धरणग्रस्तांच्या मोबदल्या संबंधी अनागोंदी निर्माण करणारा कारभार, हा स्वतःला भरसमाट मोबदला हडप करून सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा व्यक्ती गावाबाहेरील असून त्याचा पाटबंधारे आणि कृषी विभागाचे अधिकाऱ्यांशी आज कित्येक वर्षाचे साटेलोटं आहे.

याच प्रकरणात याच घटनेत ७४० गट नंबरच्या ६५ गुंठे जागेसाठी संबंधित व्यक्तीला ४५ लाख रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे आणि ६९० या आपल्या जागेच्या ६३ गुंठे जागेसाठी अवघी ४ लाख रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली असल्याचे गंगाधर कोंडगेकर यांनी सांगितले. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत या कोणालाही मोबदल वाटप करू नये अशी मागणी देखील गंगाधर कोंडगेकर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here