Kokan: कोकणातील २,००० एकर जमीन परप्रांतीयांच्या मालकीच्या !

0
48
kokan land,
कोकणातील २,००० एकर जमीन परप्रांतीयांच्या मालकीच्या !

⭐ धक्कादायक बातमी !! –
सावधान कोकणवासीयांनो
देवगड/प्रतिनीधी( पांडूरंग साटम) मागील वर्षभरात कोकणातील २,००० एकर जमीन परप्रांतीयांनी खरेदी केल्या आहेत.. तुम्हाला माहितही नसेल की येत्या काही वर्षात कोकणात काय होणारं आहे काय घडणार आहे ते. उरण ते देवगड सागरी महामार्ग- कोस्टल रोड तयार होणार आहे. यासाठी महिन्या पुर्वी ५०००० करोड रुपयांचा प्रस्ताव ठेवला होता आणि आता त्याला मान्यताही मिळाली आहे असे समजते. हि बाब कोकणच्या विकासासाठी उत्तम असली तरी तुम्ही आता कवडी मोलाने जमीनी विकणार आणि येत्या काही वर्षांत तुमच्याच कोकणात तुम्ही परप्रांतीय होणार….आहात हे मात्र धक्का दायक आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-नीरजा-वेदक-नवोदय-विद्याल/

कोकणात कोणते उद्योग उभारले जाणार? कोणत्या भागाचा किती विकास होणार आहे ? या गोष्टी नेतेमंडळी त्यांच्या पोराबाळांना आणि उद्योग जकांना आधिक कळलेल्या असल्यामुळे कोणताही गाजावाजा न करता तुमच्यातील कोणा एकाला दलाल बनवून त्या त्या भागातील जमीनी कवडीमोल दरात खरेदी करून योग्य वेळी शासनाला अथवा कंपनीना चढ्याभावात विकून बक्कळ नफा कमवतात.. – आम्ही कोकणी कधी एवढा पैसा पाहिलेला नसल्यागत वडीलोपार्जीत जमीनी कवडीमोलात विकून बायकोची साडीचोळी, पोराबाळांसाठी चड्डी खरेदी करण्यातच पैसा फुकून मोकळे होतो..आपल्याला कळतही नाही लक्ष्मी आली कधी आणि गेली कधी ..साधा पापड उद्योगही त्या पैशात उभारून अधिक काही जोडूया याच भानही कोकण्याना राहत नाही..यातील हजारात एखाद दुसरी व्यक्ती असते ती पुढच्या पीढीचा विचार करून आपल अस्तित्व जपण्याचा विचार करून वागते, वावरते. पण खर सांगायच तर आम्हा कोकण्यांची कारटी यूट्यूबर बनून कोकणची कोकण आमचा किती मस्त म्हणत रिल बनवण्यात मग्न आहेत. तर काही १० वी १२ वी पंधरावी झाली कि सुटलो बुआ एकदाचा…मुंबई-पुणा नोकर्या शोधायला..गावच्या जमिनी वस पडोत किंवा घरांना टाळे..पिझ्जा बर्गर चाटायला धावपळीचे जीवन जगाण्यातलच मज्जा हेच आणि एवढच पुरे.. पण या पेकी कोणीच ..नैसर्गीक देणगी लाभलेल्या कोकणातील साधन संपत्तीचा उपयोग करून घेवून उद्योजक बनण्याची कोणीच धडपड करतांना दिसत नाही.. थोडेफार आहेत धडपडे आजही अगदीच नाही असे नाही पण.. बोटावर मोजता येतील एवढेच. – अजूनही वेळ गेली नाही, जागे व्हा…

एवढीच काही अडचण असेल तर आपल्याच मराठी माणसांनाच जागा विका अथवा भाडे तत्वावर द्या कंपनीना…तसा करार करा..कोस्टल रोड लगत मोठमोठ्या कंपन्या उभ्या राहतील. हॉटेल, रेस्टॉरंट, बार, लाॅज येतील. या ठिकाणी विकासाला चालनाही मिळेल..पण तुमच अस्तित्व शिल्लक काही राहणार नाही…त्यांची थुंकीच उचलावी लागेल एवढ ध्यानी ठेवा.. – इमेजिका सारखा एक रत्नागिरीत प्रोजेक्ट येतोय. पाली रोड येथील ८०% जमीन देशभरातील परप्रांतीय लोकांनी दोन वर्षांपूर्वीच घेऊन ठेवल्या आहेत..आणि आपण ..

कारण आम्हीं अडाणी आम्हाला आमच्याच महाराष्ट्रात काय चाललय ते माहीतच नसतं… त्यामुळे कृपया जागे व्हाआपल्या जागा-जमिनी सरकारला, बिल्डरला, उद्योजकांना, तसेच परप्रांतीयांना अजिबात विकू नका. त्यांना कराराने घेण्यास भाग पाडा.. स्वतः च्याच कोकणात पाहुणे बनू नका.. कोकणाचा मुळशीपॅटर्न होऊ देऊ नका.कोकण संकृती येथील नैसर्गीक संपदेची लूट रोखण तूमच्याच हातात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here