🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l रत्नागिरी-
जगातील तिसरी अर्थव्यवस्था होणार असेल तर ऊर्जेची मागणी वाढणार आहे. त्याकरिता खनिज तेल लागणार आहे. त्याकरिता रिफायनरीचा विचार पुढे आला. सौदी अरेबिया व युएईच्या भागीदारीतून ही रिफायनरी येणार होती; परंतु २०१७ मध्ये नाणार येथे प्रकल्पाची सुरवात होणार होती; पण तेव्हा अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव होऊन बायडेन विजयी झाले होते. आता पुन्हा अमेरिकेमध्ये ट्रम्प यांनी निवडणुकीत विजय मिळवल्याने रिफायनरीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. https://sindhudurgsamachar.in/kolhapur-स्त्रियांनी-ज्ञानार्जन/
त्यामुळे पुढील दोन वर्षांत कोकणात रिफायनरी प्रकल्प आणण्याच्यादृष्टीने हालचाली होऊ शकतात, असे प्रतिपादन राजकीय विश्लेषक अनय जोगळेकर यांनी केले. रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघ आणि केजीएन सरस्वती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृती पहिल्या व्याख्यानमालेत ते बोलत होते