Kokan: कोकण रेल्वेचा १४ रोजी मेगाब्लॉक

0
58
गणपती स्पेशलचे आरक्षण हाऊसफुल्ल
कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या तीनही गणपती स्पेशलचे आरक्षण हाऊसफुल्ल

रत्नागिरी- कोकण रेल्वे मार्गावरील मडगांव कुमठा रेल्वे स्थानकादरम्यान मालमत्ता देखभालीच्या कामासाठी १४ सप्टेंबर रोजी ३ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे . सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत घेण्यात येणाऱ्या मेगाब्लॉकमुळे ३ रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे .https://sindhudurgsamachar.in/देश-विदेश-आठ-गडी-बाद-होताच/

या मेगाब्लॉकच्या पार्श्वभूमीवर ०९०५७ क्रमांकाची उधना मंगळूर स्पेशल १३ सप्टेंबर रोजी रत्नागिरी – मडगांव विभागादरम्यान पावणे दोन तास थांबविण्यात येणार आहे . ०६६०२ क्रमांकाची मंगळूर सेंटर मडगांव विशेष गाडी १४ रोजी कुमठा स्थानकापर्यंत चालवली जाणार आहे . ०६६०१ क्रमांकाची मडगांव मंगळूर विशेष गाडी १४ सप्टेंबर रोजी मडगांव ऐवजी कुमठा येथून मंगळूरला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here