Kokan: कोकण रेल्वेची परिपूर्ण सुसज्जता : पावसाळ्यात नऊ स्थानकांत रेल्वे मेंटेनन्स वाहने, नद्यांवर पुराचा इशारा देणारी यंत्रणा

0
39
गणेशोत्सव, कोकण-गोव्यापर्यंत नियमित रेल्वे गाड्या सोडाव्यात
पश्चिम रेल्वेनेही कोकण-गोव्यापर्यंत नियमित रेल्वे गाड्या सोडाव्यात -मोहन केळुसकर

नवी मुंबई– पावसाळ्यातील संभाव्य आपत्तींना तोंड देण्यासाठी कोकण रेल्वेने पूर्ण तयारी केली असून सर्व यंत्रणा ठिकठिकाणी तैनात केल्या आहेत. प्रशासनही संभाव्य आपत्तींचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याने कोकण रेल्वेमार्गावरील सर्व गाड्या सुरळीत धावतील, असा विश्वास कोकण रेल्वेने व्यक्त केला आहे. त्यात गस्तीसाठी ६७२ जवान, ९ स्थानकांत रेल्वे मेन्टेनन्स वाहन, वेर्णा येथे अपघात निवारण ट्रेन आणि प्रमुख नद्यांवर पुराचा इशारा देणारी यंत्रणा बसविली असल्याची माहिती गुरुवारी कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा आणि मुख्य जनसंपर्क अधिकारी गिरिश करंदीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. https://sindhudurgsamachar.in/kokan-आज-वटपौर्णिमा-जाणून-घ्या/

अशी आहे मान्सून पेट्रोलिंग

पावसाळ्यात रेल्वे मार्गावर गस्त घालण्यासाठी ६७२ जवान तैनात केले असून असुरक्षित ठिकाणी ते चोवीस तास गस्त घालणार आहेत. तसेच या भागात रेल्वेचे वेगावरील निर्बंध लादले आहेत. ९ ठिकाणी रेल्वे मेंटेनन्स व्हेईकल ठेवले आहे. त्यामुळे आणीबाणीत ते मदतीस धावून जाईल. त्यात वीर, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर रोड, कुडाळ, वेर्णा, कारवार, भटकळ आणि उडुपी स्थानकांचा समावेश आहे तर माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, करमाळी, कारवार आणि उडुपी येथे त्वरित आपत्कालीन प्रतिसादासाठी टॉवर वॅगन्स उभ्या केल्या आहेत.
अपघात झाल्यावर १५ मिनिटांत मदतीस ट्रेन
पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर मोठे धुके असल्याने दृश्यमानता कमी होते. त्यामुळे लोको पायलटना ट्रेनचा वेग ४० किमी/ताशी कमी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रत्नागिरी आणि वेर्णा येथे ऑपरेशन थिएटर आणि आपत्कालीन वैद्यकीय सहाय्याने सुसज्ज स्वयंचलित अपघात निवारण वैद्यकीय व्हॅन ठेवल्या आहेत. १५ मिनिटांत येण्यासाठी वेर्णा येथे अपघात निवारण ट्रेनदेखील सज्ज आहे.

चार ठिकाणी ॲनिमोमीटर

वाऱ्याच्या वेगाचे निरीक्षण करण्यासाठी पनवेल मार्ग (रत्नागिरी आणि निवासर दरम्यान), मांडोवी पूल (थिविम आणि करमाळी दरम्यान), झुआरी पूल (करमाळी आणि वेर्णा) आणि शरावती पूल (होन्नावर आणि मानकी दरम्यान) या चार ठिकाणी ॲनिमोमीटर स्थापित केले आहेत.

चोवीस तास नियंत्रण कक्ष

बेलापूर, रत्नागिरी आणि मडगाव येथील नियंत्रण कक्ष संपूर्ण पावसाळ्यात सुरक्षित ट्रेनचे संचालन सुनिश्चित करण्यासाठी २४/७ कार्यरत राहतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here