Kokan: कोकण रेल्वेच्या प्रश्नावर सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय समोर प्रवासी संघटनांचे लाक्षणिक उपोषण

1
16
सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय समोर प्रवासी संघटनांचे लाक्षणिक उपोषण
कोकण रेल्वेच्या प्रश्नावर सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय समोर प्रवासी संघटनांचे लाक्षणिक उपोषण

कोकण रेल्वेच्या प्रवाशी समस्या प्रश्नाबाबत लवकरच रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव सादर करण्याचे आश्वासन

सिंधुदुर्गनगरी, दि-१५:- सिधुदुर्गनगरी -कोकण रेल्वेच्या सर्व स्टेशन वरील समस्या आणि सुविधा जलद गाड्यांना थांबे पुरेसा तिकीट कोठाआणि परप्रांतीयांच्या लोंढ्यात कोकणी माणूस चिरडला जात आहे यावर लक्ष देण्यासाठी आयोजित उपोषणालाराज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी भेट देऊन रेल्वेच्या प्रश्नाबाबत योग्य ती दखल घेऊ रेल्वे मंत्र्यांशी ही बोलू तर जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी लवकरच रेल्वेच्या प्रश्नाबाबत क्षेत्रीय प्रबंधक मार्फत समस्यांचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवू तर कोकण रेल्वेचे क्षेत्रीय प्रबंधक रवींद्र कांबळे यांनी अखेरआपल्या अखत्यारीतील समस्या आठ दिवसात सोडवू व रेल्वे चेअरमन मॅनेजिंग डायरेक्टर यांच्याकडे विविध समस्यांचा प्रस्ताव सादर करू असे आश्वासन दिल्यामुळे आजचे उपोषण संपविताना अध्यक्ष प्रकाश पावस्कर यांनी या प्रश्नी लक्ष न दिल्यास आम्हाला पुन्हा धरणे आंदोलन किंवा रेल रोको सारखा मार्ग पत्करावा लागेल असा इशारा ही दिला आहे सिधुदुर्गगरी येथे जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्वारावर कोकण रेल्वे अधिकारी आणि बांधकाम विभाग यांच्यातील समन्वयाचा अभाव असल्यामुळे सांडपाणी , विद्युतीकरण ,अंतर्गत प्लॅटफॉर्म यांसह अनेक सुविधा पासून ही सर्वचस्टेशन वंचित आहेत कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत समावेश करा यावर लक्ष वेधणे साठी १५ ऑगष्ट स्वातंत्रदिनीरोजी कोकण रेल्वे प्रवासी संघर्ष आणि समन्वय समितीच्या माध्यमातून लक्षवेधी लाक्षणिक उपोषण केले, यावेळी कोकणरेल्वे संघर्ष व समन्वय समिती अध्यक्ष प्रकाश पावसकर सिधुदुर्ग स्टेशनचे अध्यक्ष शुभम परब जिल्हा समन्वयक नंदन वेगुर्लेकर रानबांबुळी सरपंच परशुराम परब , गावराई सरपंच सोनल शिरोडकर , सुकळवाड सरपंच युवराज गरुड , कसाल सरपंच राजन परब ,दादा गावडे , सहसचिव . अजय मयेकर खजिनदार साई आंबेरकर रमेश जामसांडेकर सुहास परब , सुनिल पाताडे , प्रणिल कावले , आबाजी राणे , राजू परुळेकर ,माजी सभापतीअजिक्य पाताडे , प्रसाद मोरजकर ,सागर कुशे , अशोक परब या सह मोठ्याप्रमाणात रेल्वे प्रवाशी व्यापारी यांनी उपस्थित राहून पाठीबा दिला उपोषणा उत्फुर्द प्रतिसाद मिळाला यावेळी रेल्वे क्षेत्रीय वाहतूक प्रबंधक आंबोडकर यांनी रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून लेखी पत्र देऊन उपोषण संपविण्याचे आवाहन केले आपल्या अखत्यारीतील प्रश्न क्षेत्रीय प्रबंधक रत्नागिरी निर्णय घेतील व उर्वरित मागण्यांबाबत रेल्वे चेअरमन डायरेक्टर यांच्या स्तरापर्यंत प्रस्ताव पाठविला जाईल असे सांगितले .https://sindhudurgsamachar.in/kokan-आकाश-फिश-मिल-अँड-फिश-ऑईल-प/

यावेळी दिलेल्या निवेदनात सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण ८ तालुके आहेत. त्यापैकी अनुक्रमे कणकवली, वैभववाडी, कुडाळआणि सावंतवाडी या चारही तालुक्यातून कोकण रेल्वेचा अधिकृत रेल्वे मार्ग असून अनुक्रमे खारेपाटण, वैभववाडी रोड, आचिर्णे, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग नगरी, कुडाळ झाराप सावंतवाडी आणि मडुरा अशी दहा रेल्वे स्टेशन आहेत. वरील दहा स्टेशन पैकी केवळ कणकवली, कुडाळ, सावंतवाडी याच रेल्वे स्टेशन वर बहुतांश गाड्यांना थांबा मिळत असून उर्वरित सात स्टेशनवर किरकोळ थांबे वगळता गेली अनेक वर्षे सातत्याने अन्याय केला जात आहे. जिल्ह्यातील सर्व स्टेशन वर मूलभूत सोयी सुविधांचा अभाव असून तुलनात्मक दृष्ट्या जवळच्या रत्नागिरी जिल्ह्यात तसेच लगतच्या गोवा राज्यामध्ये असलेल्या रेल्वे स्टेशन वर चांगल्या दर्जाच्या सोयीसुविधा स्थानिक लोकांच्या तसेच राजकीय दबावामुळे निर्माण करून दिलेल्या आहेत. सदरील भेदभाव आमच्या जिल्ह्यातील नागरिकावर केला जातोय याचे उत्तर गेल्या २५ वर्षात आम्हाला मिळालेले नाही. येणाऱ्या गणेश चतुर्थीच्या काळात लाखो मुंबईकर चाकरमानी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार असून तिकीट उपलब्ध होत नसल्यामुळे संडासच्या बाजूला बसून व दरवाज्यावर लटकत राहून अतिशय वाईट पद्धतीने स्थानिक प्रवाश्यांना प्रवास करावा लागतो. हा त्रास गेली अनेक वर्षे जिल्हावासीय सहन करत असून येणाऱ्या काळात हा मानसिक आर्थिक आणि सामाजिक त्रास कमी करण्यासाठी सी.एस.टी.एम. ते सावंतवाडी व दादर ते मडूरा अशा स्वतंत्र दोन गाड्या दररोज कायमस्वरूपी चालू कराव्यात जेणे करुन जिल्ह्यातील प्रवाशांना त्रास होणार नाही.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here