दापोली- कोकण मराठी साहित्य परिषद शाखा दापोलीच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी जन्मशताब्दी वर्ष आणि भारतरत्न डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या दापोली तालुकास्तरीय निबंधलेखन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ दि. १५ ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिनादिवशी रामराजे महाविद्यालय दापोली येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामराजे वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. अशोक निर्बाण हे होते. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-शाळांचा-दर्जा-सर्वोत्त/
कोकण मराठी साहित्य परिषद शाखा दापोली आणि रामराजे महाविद्यालय दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बक्षीस वितरण समारंभासाठीच्या व्यासपीठावर रामराजे कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य वेदीका राणे, कोमसाप दापोलीचे अध्यक्ष चेतन राणे, उपाध्यक्ष सुनिल कदम, कुणाल मंडलीक, जनसंपर्क प्रमुख बाबू घाडीगांवकर, सहसचिव अरविंद मांडवकर, राजेश पवार, निबंधलेखन स्पर्धेचे परिक्षक सुदेश मालवणकर आदी मान्यवर उपस्थित होते. डाॅ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून समारंभाची सुरुवात झाली. https://sindhudurgsamachar.in/latest-e-paper/
यावेळी निबंधलेखन स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, सन्मानपत्र, सन्मानपदक देऊन गौरविण्यात आले. यामध्ये इयत्ता पाचवी ते सातवीसाठीच्या गटात कु. विनित विनय राणे याने प्रथम, कु. नीरजा मनोज वेदक हिने द्वितीय तर वेदीका जितेंद्र चव्हाण हिने तृतीय क्रमांक पटकावला. इयत्ता आठवी ते दहावीसाठीच्या गटात कु. पुर्वा सचिन जगदाळे हिने प्रथम, कु. जान्हवी संदीप जामकर हिने द्वितीय तर कु. श्रीया संदीप दाभोळे हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. इयत्ता अकरावी ते पंधरावीसाठीच्या महाविद्यालयीन गटात कु. ऋतुजा मंगेश माने हिने प्रथम, कु. पुर्वा प्रदीप रोकडे हिने द्वितीय तर कु. पुजा संतोष नाचरे हिने तृतीय क्रमांक पटकावला. या समारंभाच्या निमित्ताने परिक्षक सुदेश मालवणकर, बाबू घाडीगांवकर, सुनील कदम, वेदीका राणे यांनी उपस्थित विद्यार्थी, शिक्षक व पालकांसमोर आपले विचार मांडले. डाॅ. अशोक निर्बाण यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जीवन गुहागरकर यांनी केले, तर स्मिता बैकर यांनी सर्वांचे आभार मानले.