Kokan: खारेपाटण येथे झालेल्या अपघातात दोघे तरूण जागीच ठार

0
18
Kokan: खारेपाटण येथे झालेल्या अपघातात दोघे तरूण जागीच ठार
खारेपाटण येथे झालेल्या अपघातात दोघे तरूण जागीच ठार

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार – खारेपाटण / प्रतिनिधी

खारेपाटण येथे मुंबई – गोवा महामार्गावर दुचाकी आणि कंटेनर यांच्यात झालेल्या धडकेत राजापूर येथील दोघे तरुण जागीच ठार झाले. ही घटना काल रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास मुंबई – गोवा महामार्गावर घडली. सचिन एकनाथ लाड रा. हसोळ राजापूर, वय 35 हा युवक जागीच ठार झाला. तर त्याच्या समवेत असलेला तानाजी वामन शेळकर वय 30, रा. कोडवशी राजापूर शिखरवाडी याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत कणकवली पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. https://sindhudurgsamachar.in/maharahtra-कपूर-कुटुंबीय-पंतप्रधा/

हासोळ येथील बाईक स्वार आपल्या ताब्यातील हिरो होंडा कंपनीची मोटारसायकल क्र.एम एच 08 एक्स 4252 घेऊन खारेपाटण मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गवर आले असता. खारेपाटण बॉक्सवेल ओवर फ्लाय ब्रिजवर चूकीच्या साईडने जात असल्याने कणकवलीच्या दिशेने आलेला व मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर वाहन क्र.एम एच 46 सी एल 3158 यांची समोरासमोर धडक होऊन मोटार सायकलस्वार सचिन लाड जागीच ठार झाला. तर त्याच्या सोबत असलेला तानाजी शेळकर हा गंभीर जखमी झाला. त्याला 108 वाहनाने पुढील उपचारासाठी खारेपाटण प्रा. आ. केंद्रात नेले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here