Kokan: ग्रामदैवतांच्या पालख्या निघाल्या गावभेटीस

0
71
ग्रामदैवतांच्या पालख्या
ग्रामदैवतांच्या पालख्या निघाल्या गावभेटीस

दापोली – कोकणातील शिमगोत्सवाची धामधूम अजूनही संपलेली नाही. कोकणातील काही गावांतील ग्रामदैवतांच्या पालख्यांच्या गावभेटी गुढीपाडव्यापर्यंत सुरुच राहणार आहेत. दापोली तालुक्यातील धानकोली येथील ग्रामदैवतांच्या पालख्यांची म्हणजे श्री देवी जानाई, मानाई, नवलाई, सोमैय्या या दैवतांच्या पालख्या सध्या गावभेटीस निघाल्या आहेत. गावातील प्रत्येक घरात मोठ्या श्रद्धेने पालख्यांचे स्वागत व पूजा होत आहे. धानकोली गावात प्रत्येक घरात ग्रामदैवतांच्या लेण्यांचे पूजन, मिरवणूक, पालखी नाचविणे, शेरणे काढणे यांसारखे पारंपारिक कार्यक्रम होत आहेत. याशिवाय पालखीसोबत राधाचा पारंपारिक नाचही आहे. अशा पालख्यांच्या भेटीसाठी चाकरमानी गावात दाखल झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here