Kokan: चंद्रनगरच्या आरोही मुलूखची नवोदय विद्यालयसाठी निवड

0
38
नवोदय विद्यालय
चंद्रनगरच्या आरोही मुलूखची नवोदय विद्यालयसाठी निवड

दापोली- दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी आदर्श शाळा चंद्रनगर शाळेत शिकणाऱ्या कु. आरोही महेश मुलूख हिची नवोदय विद्यालय प्रवेशासाठी निवड झाली असून तिने संपादन केलेल्या या उज्ज्वल यशाबद्दल आरोहीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-आचरा-परिसरात-सोमवारी-रात/

नवोदय विद्यालय प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची दुसरी यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली असून या यादीत चंद्रनगरच्या कु. आरोही महेश मुलूख हिने स्थान पटकावले आहे. याआधीच्या पहिल्या यादीत याच शाळेतील कु. नीरजा मनोज वेदक हिची निवड झाली होती. एकाच शाळेतील दोन विद्यार्थीनींची नवोदय विद्यालय प्रवेशासाठी निवड झाल्याबद्दल त्यांच्या शिक्षिका मानसी सावंत यांचेही अभिनंदन होत आहे. चंद्रनगर शाळेच्या आरोही मुलूख हिचे मुख्याध्यापक मनोज वेदक, शिक्षक बाबू घाडीगांवकर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुपेश बैकर, उपाध्यक्ष राकेश शिगवण, चंद्रनगरच्या सरपंच भाग्यश्री जगदाळे, गिम्हवणे केंद्रप्रमुख सुनील कारखेले, शिक्षण विस्तार अधिकारी पद्मन लहांगे, दापोली तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव, जिल्हा नियोजन समिती सदस्य मोहन मुळे आदींनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here